माझ्या कुळाच्या उद्धाराने ठाकरेंचे नैराश्य दूर होत असेल तर तो सन्मानच : बावनकुळेंचं प्रत्युत्तर

Chandrashekar Bawankule : आई वडीलांचा कष्टाचा वारसा मिळाला आहे. गरीब शेतकऱ्याच्या पोटी जन्मास येणे गुन्हा आहे का?
Chandrashekar Bawankule
Chandrashekar Bawankule Sarkarnama

मुंबई : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील मेळाव्यात भाजपा आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. ठाकरे यांनी वंशवादाचा मुद्द्यावर टीका करताना 'बावनकुळे' शब्दाचा उल्लेख केला होता. उद्धव ठाकरे म्हणाले, "गेल्या काही दिवसांपासून माझ्या घराण्यावर आणि वंशावरून टीका होत आहे. मात्र, भाजपाचा तर वंशाचा वाद आहे." वंशावादावरून होणाऱ्या टीकेवर पलटवार करताना ठाकरेंनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाचा वापर केला. आता यावर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले.

Chandrashekar Bawankule
Shiv Sena : ठाकरे-शिंदे गटाला मोठा धक्का : दोन माजी आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश

“आज वशंवादावरून माझ्यावर टीका केली जात आहे. माझ्या घराण्यावर, वंशावर टीका होत आहे. मला माझ्या वंशाचा अभिमानच आहे. घराण्याचा अभिमान आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यावेळी तुमचं योगदान काय? संयुक्त महाराष्ट्र समिती फोडणारे हे जनसंघच. मात्र, तुमच्या वंशावरूनच वाद आहे. भाजपाने पक्षात बाहेरचे इतके उपरे भरून ठेवले आहेत की, आता तुमचा वंश बावनकुळे की एकशे बावनकुळे हेच कळत नाही ?” अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी टीका केली होती.

आता उद्धव ठाकरेंच्या या टीकेला बावनकुळे यांनी उत्तर दिले आहे. बावनकुळे ट्विट करत म्हणाले, “उद्धव ठाकरे हे वारंवार माझ्या कुळाचा कुत्सितपणे उल्लेख करतात. माझे वडील शेतकरी आहेत. आई- वडिलांनी मोठ्या कष्टातून मला घडविले. केवळ त्यांच्या कष्टाचा, संघर्षाचा वारसा मला मिळाला आहे. दुसरे काही नाही. गरीब शेतकऱ्याच्या पोटी जन्मास येणे गुन्हा आहे का? माझ्या कुळाचा उद्धार करून उद्धव ठाकरे यांचे नैराश्य दूर होत असेल तर तो माझ्या कुळाचा सन्मानच आहे.” अशा शब्दात बावनकुळे यांनी सुनावले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com