शशीकांत शिंदेंनी ते 100 कोटी घेतले असते तर संपत्ती दहा पट वाढली असती!

भाजपची ऑफर स्वीकारत शंभर कोटी रूपये घेतले असते तर त्यांची संपत्ती एकशे नऊ कोटी ११ लाख ७५ हजार रूपयांची झाली असती. एकुणच त्यांच्या संपत्ती तब्बल दहा पट वाढ झाली असती. पण संपत्तीत वाढविण्यापेक्षा नेत्यावरील प्रेम आणि श्रध्दा महत्वाची मानून त्यांनी भाजपची ऑफर धुडकावली होती. त्यामुळे शशीकांत शिंदेंची संपत्ती आहे तेवढीच राहिली.
If Shashikant Shinde had taken it for Rs 100 crore, his wealth would have increased tenfold!
If Shashikant Shinde had taken it for Rs 100 crore, his wealth would have increased tenfold!

सातारा : राष्ट्रवादीचे आमदार शशीकांत शिंदे यांना मागील विधानसभा निवडणूकीत भाजपकडून शंभर कोटी व मंत्रीपदाची ऑफर झाली होती. केवळ राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरील अढळ निष्ठेपोटी त्यांनी ही ऑफर धुडकावली होती. जर त्यांनी ही ऑफर स्वीकारली असती, तर त्यांची संपत्ती नऊ कोटीवरून एकशे नऊ कोटींवर गेली असती. एकुणच त्यांच्या संपत्तीत दहा पटीने वाढली असती. 

विधान परिषदेची आमदारकी देताना शशीकांत शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्ष संघटना वाढविण्याची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे आमदार शिंदे सध्या चार्ज झालेले आहेत. त्यांच्यावर मुंबई महापालिकेचीही जबाबदारी दिली आहे. तसेच सातारा जिल्ह्यातील सर्वच निवडणूकीत त्यांनी लक्ष घालण्याचा निर्णय घेतला आहे.

आगामी काळात सातारा जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या व  पालिकांच्या निवडणूकांची रणधुमाळी उडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी जिल्ह्याच्या राजकारणात अधिक सतर्कतेने लक्ष घातले आहे. ग्रामपंचायत निवडणूकीत राष्ट्रवादीला मिळालेल्या यशाचा लेखाजोखा मांडताना त्यांनी मागील विधानसभा निवडणूकीत त्यांना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजपमध्ये येण्याची ऑफर दिल्याचा गौप्यस्फोट केला होता.

यामध्ये त्यांनी निवडणूकीसाठी शंभर कोटी लागले तरी खर्च करू, मंत्रीपद देऊ असेही भाजपच्या या नेत्यांनी सांगितल्याचे नमुद केले होते. आमदार शशीकांत शिंदे यांच्या या गौप्यस्फोटावर एकाही भाजपच्या नेत्यांने साधी प्रतिक्रिया आजपर्यंत दिलेली नाही. त्यामुळे या ऑफरमध्ये सत्य असल्याचे स्पष्ट होत आहे.पण भाजपची ही ऑफर त्यावेळी शशीकांत शिंदे यांनी स्वीकारली असती तर नेमके काय झाले असते, याची माहिती आम्ही घेतली.

आमदार शशीकांत शिंदे यांनी त्यांच्या विधान परिषदेच्या निवडणूकीवेळी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्या नावावर स्वसंपादित मालमत्ता नऊ कोटी ११ लाख ७५ हजार रूपयांची असल्याचे नमुद केले आहे. त्यांनी भाजपची ऑफर स्वीकारत शंभर कोटी रूपये घेतले असते तर त्यांची संपत्ती एकशे नऊ कोटी ११ लाख ७५ हजार रूपयांची झाली असती. एकुणच त्यांच्या संपत्ती तब्बल दहा पट वाढ झाली असती.

पण संपत्तीत वाढविण्यापेक्षा नेत्यावरील प्रेम आणि श्रध्दा महत्वाची मानून त्यांनी भाजपची ऑफर धुडकावली होती. त्यामुळे शशीकांत शिंदेंची संपत्ती आहे तेवढीच राहिली. पण त्यांना कोरेगाव मतदारसंघातून पराभूत व्हावे लागले. त्याबदल्यात त्यांना राष्ट्रवादीने विधान परिषदेवर घेऊन आमदार केले. तसेच त्यांच्यावर पक्ष संघटना वाढीची जबाबदारीसह मुंबई महापालिकेच्या निवडणूकीचीही जबाबदारी दिली आहे. तसचे आता ते सातारा जिल्हा बँकेसह सातारा पालिकेच्या निवडणूकीतही राष्ट्रवादीच्या पॅनेलच्या माध्यमातून भाजपच्या दोन राजांपुढे आव्हान उभे करणार आहेत.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com