'मोदी-शहांचं नाव घेतलं नाही तर नारायण राणेंची नोकरी जाऊ शकते'

Nana Patole news| Narayan Rane भाजपसाठी नरेंद्र मोदींच देव आहेत, असं वर्तन भाजपचे आहे.
Nana Patole | Narayan Rane
Nana Patole | Narayan Rane

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी (Narayan Rane) मोदी-शहाचं नाव घेणं स्वाभाविकच आहे, कारण जर राणेंनी त्याचं नाव घेतलं नाही तर त्यांची नोकरी जाऊ शकते, असा सणसणीत टोला कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी लगावला. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दिशा सॅलियन प्रकरणात शनिवारी (५ मार्च) राणे पिता पुत्रांची मालाड पोलिसांनी चौकशीसाठी बोलवले होते. नऊ तासांच्या चौकशी नंतर त्यांना रात्री उशिरा सोडण्यात आले. (Nanan Patole Criticized on Narayan Rane)

या प्रकरणी बोलताना नाना पटोले यांनी नारायण राणेंवर निशाणा साधला आहे. गेल्या दोन-तीन दिवसापासून ईडी आणि सीबीआय तपास करत आहे आणि काहीच हाती येत नाही. हा तपासाचा भाग आहे, त्यामुळे आम्ही यासंदर्भात बोलत नाही, पण राणेंनी मोदी शहाचं नाव घेणं स्वाभाविकच आहे, कारण जर राणेंनी मोदी शहांचं नाव घेतलं नाही तर त्यांची नोकरी जाऊ शकते. असे म्हणत त्यांनी नारायण राणेंची टोला लगावला आहे.

Nana Patole | Narayan Rane
रश्मी शुक्लांना तिसरा धक्का नाना पटोले देणार; सोबत फडणविसांनाही इशारा

याचवेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावरही हल्लाबोल केला. पंतप्रधानांनी छत्रपतींचा अपमान केला, राज्यपाल देखील अपमान करतात, त्यांच्यात छत्रपतींच्या विरोधातली मानसिकता स्पष्ट दिसते. भाजपसाठी नरेंद्र मोदींच देव आहेत, असं वर्तन भाजपचे आहे. राजमुद्रा आणि छत्रपतींचा अपमान करण्याचं कांन्ट्रॅक्ट भाजपनं घेतलय का?,असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

पुण्यात 'नरेंद्र मोदी गो बॅक'चे पोस्टर, घोषणाबाजी पाहायला मिळाली. म्हणजेच देशभरात मोदींचा विरोध होतो. दौऱ्यामुळे पुण्याच्या जनतेची मोदी गैरसोय करत आहेत. पुणेकर नागरिकही भाजपवर नाराज दिसत आहेत.

रशिया युक्रेनच्या युद्धात 20 हजार विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले होते. पण प्रचारक पंतप्रधान निवडणूकीमध्ये व्यस्त होते, त्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल झाले. सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी विद्यार्थ्यांना 80 किलोमीटरची पायपीट करत युक्रेन-पोलंडच्या सीमेवर जावे लागले. भारत सरकारकडून आमची कोणतीही जबाबदारी घेतली नाही, अशा अनेक तक्रारी विद्यार्थ्यांकडून केल्या गेल्या, असेही नाना पटोले यांनी नमुद केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com