महाराष्ट्र खचला तर... : राऊतांचा सत्ताधाऱ्यांना इशारा

Sanjay Raut Politics| फुटीरांच्या प्रत्येक गटात एक एकनाथ शिंदे कायम असतो, हे लक्षात घ्या."
Sanjay Raut Latest News
Sanjay Raut Latest NewsSarkarnama

Sanjay Raut : मुंबई : राजकारण करण्यासाठी आणि राजकीय शत्रूत्व जपण्यासाठी उभा जन्म पडलाय. पण महाराष्ट्र खचला तर राजकारण करायला आपणही उरणार नाही, याचं भान राज्यकर्त्यांनी ठेवलं पाहिजे, असा इशारा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिला आहे. आज सकाळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

महाराष्ट्राचं राजकारण खूपच अस्थिर झाल्याने दिल्लीतूनच मध्यावधीची तयारी सुरू झाली आहे. महाराष्ट्रात लवकरच मध्यावधी निवडणुका लागणार असल्याचं भाकीत राऊतांनी केलं आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात मध्यावधी निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आदेश शिवसैनिकांना दिले होते. तेव्हापासून राज्यात मध्यावधी निवडणुका लागण्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. या चर्चांना दुजोरा देणारं विधान संजय राऊत यांनीही केलं आहे. महाराष्ट्रातील मध्यावधी निवडणुकीची तयारी दिल्लीतूनच सुरू झाली असल्याचं संजय राऊतांनी म्हटलं आहे.

'बावनकुळे म्हणजे महाराष्ट्राला लागलेला काळा डाग'

याचवेळी त्यांनी महाराष्ट्रातील प्रकल्प राज्याबाहेर जाण्यावरुनही भाष्य केलं आहे. महाराष्ट्रातून एकापाठोपाठ एक प्रकल्प जात असतानाही त्यावर कुणीच काही बोलत नाही. याचं एकमेकांवर खापर फोडण्यापेक्षा हे प्रकल्प का जातायेत, आपल्याकडून हे प्रकल्प कोण ओरबाडतय? यावरही राज्यातील सत्ताधाऱ्यांनी आणि विरोधकांनी विचार करुन निर्णय घ्यावा, असं आवाहन राऊत यांनी केलं.

तसेच, खासदार गजानन किर्तीकर यांच्यावर टीका करतानाच महाराष्ट्राच्या आगामी राजकारणाबाबत एक सूचक विधान केले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मध्यावधी निवडणुकांचे संकेत दिले होते. आता हाच धागा पकडत राऊत म्हणाले की, "फुटीरांच्या प्रत्येक गटात एक एकनाथ शिंदे कायम असतो, हे लक्षात घ्या." या विधानामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे.

महाराष्ट्राला भगदाड पाडण्याचं काम सुरू आहे, औद्योगिक दृष्ट्या कमकुवत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. देशाच्या नकाशावरून महाराष्ट्र नष्ट करण्याचे पडद्यामागे प्रयत्न सुरू आहेत. ते रोखण्यासाठी काही काळ एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणं थांबवावं, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यांनी पुढाकार घेऊन विरोधकांची बैठक बोलवावी, असं आवाहन संजय राऊत यांनी केलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in