'मुख्यमंत्री ठाकरे 'वर्क फ्रॉम होम' बरोबर 'वर्क फ्रॉम जेल' देणार असतील तर त्यांना धन्यवाद'

मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांच्यावर मुंबईतील सांताक्रूझ पोलिस ठाण्यात (Mumbai Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
mohit kamboj
mohit kambojsarkarnama

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते व अल्पसंख्यांक विकासमंत्री नबाव मलिक (Nawab Malik) यांना बुधवारी (ता. 23 फेब्रुवारी) ईडीने (ED) अटक केल्यानंतर भाजपचे (BJP) नेते मोहित कंबोज (mohit kamboj) यांनी हातात तलवार काढत जोरदार जल्लोष केला. मात्र, हे कंबोजांना चांगलेच महागात पडले असून त्यांच्यावर याप्रकरणी मुंबईतील सांताक्रूझ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोना नियमांचे उल्लंघनासह शस्त्रास्त्र कायद्यांच उल्लघंन केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावर कंबोजांनी नाराजी व्यक्त केली असून आपल्यावर चुकीच्या पद्धतीने गुन्हा नोंदवल्याचे म्हटले आहे. तर, मलिकांवर पुन्हा गंभीर आरोप करत त्यांच्या मंत्रीपदाच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. याबरोबरच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना जर मलिकांचा राजीनामा घ्यायचा नसेल आणि त्यांनी वर्क फ्रॉम होम बरोबरच वर्क फ्रॉम जेल हा मेसेज संपूर्ण महाराष्ट्रभर आणि देशभर देणार असतील तर त्यांचे धन्यवाद मानतो, असा टोला कंबोंज यांनी लगावला आहे.

mohit kamboj
भाजपच्या प्रदेशाध्यक्षांची जीभ घसरली; म्हणाले, काळ्या नवरीला...

कंबोज म्हणाले की, माझ्यावर चुकीच्या पद्धतीने अनेक गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे. जेव्हा शिवसेना भावनामध्ये संजय राऊत यांनी पत्रकार परिषद करून लोक जमा केली आणि आता महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री व त्यांचे कार्यकर्ते महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर एकवटले आहेत यांच्यावर गुन्हा दाखल नाही करणार का? माझ्यावर कलम 188 चा गुन्हा दाखल केल्याने मी हायकोर्टात जाणार आहे. मलिक यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री ठाकरे निर्णय घेतील. त्यांना जर वाटत असेल की मंत्रिमंडळ जेलमधून चालावे तर, त्यांचे अभिनंदन आहे. हा नैतिकतेचा भाग आहे, असा टोला कंबोज यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना लगावला.

mohit kamboj
फडणवीस यांच्या विरोधातील 'त्या' तक्रारीची मिटकरींनी करुन दिली आठवण

अनिल देशमुख तर जेलमध्येच आहेत आता त्यांच्या जोडीला सलीम सुद्धा जेलमध्ये जातील. मुख्यमंत्री ठाकरे यांना जर मलिकांचा राजीनामा घ्यायचा नसेलच आणि त्यांनी वर्क फ्रॉम होम बरोबरच वर्क फ्रॉम जेल हा मेसेज संपूर्ण महाराष्ट्रभर आणि देशभर देणार असतील तर त्यांना मी धन्यवाद देतो. टाडा लागलेल्या गुन्हेगारी व्यक्तीकडून जमीन खरेदी करता येत नाही मात्र, मलिकांनी ती केली आहे. यासंदर्भात तपास यंत्रणा काम करत आहे. त्यावर अधिक भाष्य मी करणे योग्य असणार नाही. याबरोबरच बांगलादेशमधून महिलांना आणून त्यांना वेश्याव्यवसायत ढकलण्याबाबत मलिक यांच्या विरोधातील पुरावे मी NIA ला माहिती देणार आहे. देशापेक्षा मोठा कोणता नेता नसून छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात अश्या पद्धतीने काम करणाऱ्या नेत्याला मंत्री मंडळात कसे ठेवले जाते, असा सवालही व्यक्त केला आणि महाविकास आघाडी सरकारच्या कार्यपद्धतीवर कंबोज यांनी जोरदार हल्लाबोल केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com