आमदार सरवणकरांवर कारवाई न केल्यास खरी शिवसेना दाखवू ; खासदार सावंतांचा इशारा

Arvind Sawant : पोलिसांवर कुणाचा दबाव आहे?
Arvind Sawant Latest News
Arvind Sawant Latest NewsSarkarnama

मुंबई : राज्यात जल्लोषात, आनंदात गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक (ganesh visarjan 2022) पार पडली. पण प्रभादेवी येथील मिरवणुकीच्या वादाचे पडसाद शनिवारी रात्री उमटले. प्रभादेवी (prabhadevi) परिसरातील सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीत ठाकरे आणि शिंदे गटातील कार्यकर्त्यांमध्ये शनिवारी सकाळी राडा झाला.

त्यानंतर पुन्हा एकदा या दोन्ही गटात मध्यरात्री हाणामारीती घटना घडली आहे. याप्रकरणी आत्तापर्यंत २५ ते ३० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आले असून शिवसेनेच्या ५ जणांना ताब्यात घेण्यात आले होते. मात्र त्यांना आता सोडण्यात आल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणी गोळीबार केलेल्या आमदार सरवणकरांवर कारवाई न केल्यास खरी शिवसेना दाखवू,असा इशारा शिवसेना खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी दिला आहे. (Arvind Sawant Latest News)

Arvind Sawant Latest News
खासदार श्रीकांत शिंदेंचे भाजपला उत्तर; ‘माझे जे काही होईल, ते कल्याणमधूनच...’

शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर आणि त्यांचे सुपूत्र समाधान सरवणकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी त्यांच्यावर योग्य कारवाई न केल्यास खरी शिवसेना दाखवू,सावंत यांनी दिला आहे.

शिंदे गटाचे कार्यकर्ते संतोष तेलवणे यांनी तक्रार दिली. त्यावरुन शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या राड्यावेळी शिवसेनेच्या सुनील शिंदे यांनी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांच्यावर गंभीर आरोप केला होता. सरवणकरांनी हवेत गोळीबार केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला होता. यामुळे दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्याचे काम पोलिसांनी सुरु केले होते. मात्र अटक करण्यात आलेल्या पाच शिवसैनिकांना आज सोडून देण्यात आले असून आमदार सदा सरवणकर आणि त्यांचे सुपुत्र समाधान सरवणकर यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

Arvind Sawant Latest News
महादेव जानकर करणार भाजपची गोची; बारामती स्वबळावर लढण्याची घोषणा!

या प्रकरणानंतर आज शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत दादर पोलीस स्थानकात दाखल झाले होते. पोलिसांसोबत चर्चा केल्यानंतर खासदार सावंत यांनी आमदार सदा सरवणकर यांनी दोन ठिकाणी गोळीबार केला असल्याने त्याच्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती दिली. तसेच त्याच्यावर योग्य कारवाई न केल्यास खरी शिवसेना दाखवून देऊ,असा इशाराही सावंतांनी यावेळी दिला.

दरम्यान तक्रार करण्यासाठी दाखल झालेल्या कार्यकर्त्यांवरच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांवर कुणाचा दबाव आहे?,असा सवालही त्यांनी उपस्थित करत शिंदे गटाकडून गुंडागिरी सुरु असून सोशल मीडियावरुन शिवसेनेची बदनामी केली जात असल्याचा आरोपही सावंत यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com