आमच्यात वैचारिक मतभेद... अजितदादा, नितीन राऊतांची 'पर्णकुटीत' चर्चा

नितीन राऊत Nitin Raut यांचा पाय मुरगळल्याचे Legs twisted अजित दादांना Ajit pawar समजल्याने त्यांनी श्री. राऊत यांच्या घरीच जाण्याचा बेत आखला.
आमच्यात वैचारिक मतभेद... अजितदादा, नितीन राऊतांची 'पर्णकुटीत' चर्चा
Ajit Pawar, Nitin Rautsarkarnama

मुंबई : ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात कॅबीनेटच्या बैठकीत अनेकदा निधी वाटपावरून खटके उडतात, तसेच शाब्दिक चकमकीही सर्वज्ञात आहेत. मात्र, बुधवारी या दोन्ही नेत्यांमधील वेगळाच जिव्हाळा अनुभवायला मिळाला. अजित पवार हे थेट नितीन राऊत यांच्या मलबार हिलमधील 'पर्णकुटी' या बंगल्यावर पोहोचले. दोन्ही नेत्यांनी राजकिय व शासकिय विषय टाळून सुमारे अर्धातास गप्पा मारल्या.

मुळात बैठकीच्या निमित्तान भेट होत होती. पण, नितीन राऊत यांचा पाय मुरगळल्याचे अजित दादांना समजल्याने त्यांनी श्री. राऊत यांच्या घरीच जाण्याचा बेत आखला. दरम्यान, ''आमच्या दोघांमध्ये काही विषयांवर मतभेद जरूर आहेत. पण, आम्ही वैयक्तिक संबंध कायम जपले आहेत,'' असे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सांगितले. तसेच शरद पवारही आमच्या घरी आवर्जून येत असतात, असेही त्यांनी सांगितले.

Ajit Pawar, Nitin Raut
Video: आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत इंधन कपातीचा विषय नाही; अजित पवार

पाय दुखावलेला असूनही अजित दादा बंगल्यावर आल्याचे समजताच राऊत कार्यालयाबाहेर त्यांना घेण्यासाठी आले होते. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास तीस मिनीटे मनमोकळ्या गप्पा रंगल्या. एकमेकांच्या कुटुंबियांची त्यांनी आवर्जून विचारपूस केली. मंत्री राऊत आणि अजित दादा यांचा स्वभाव स्पष्ट बोलणारा असल्याने हे मतभेद असणे स्वाभाविक आहे. मात्र, दोन्ही नेत्यांनी वैयक्तिक संबंध कायम असल्याचे या भेटीतून स्पष्ट झाले आहे. 'पर्णकुटी' बंगल्यावर माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे अनेक वर्षे वास्तव्य होते. त्यावेळी अजित दादा पर्णकुटी बंगल्यावर येत जात होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.