IAS IPS Transfer : सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत शिंदे-फडणवीसाचं अखेर ठरलं..

IAS Transfer : काही दिवसात प्रशासनात मोठे फेरबदल होणार असल्याचे स्पष्ट आहे.
Deputy Cm Devendra Fadanvis-Cm Eknath Shinde
Deputy Cm Devendra Fadanvis-Cm Eknath ShindeSarkarnama

IAS Transfer : राज्यात ठाकरे सरकारची सत्ता उलथवून लावल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने आपला अजेंडा राबविण्यास प्रारंभ केला आहे. ‘आयएएस आणि आयपीएस’ अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत सध्या राज्यात राजकारण तापलं आहे. (IAS IPS Transfer news update)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील बदल्यांच्या चर्चेत एकमत होऊन प्रशासनात येत्या काही दिवसांत बदल होण्याचे चिन्ह आहे. सत्ताधारी-विरोधकांच्या संघर्षातही सोयीच्या ठिकाणी आणि महत्त्वाच्या पदावर जाण्याची धडपड अधिकारी करत आहेत. त्यामुळे बदल्यांकडे लक्ष लागले आहे. पावणेदोन-दोन महिने रखडलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पुढील काही दिवसात प्रशासनात मोठे फेरबदल होणार असल्याचे स्पष्ट आहे.

IAS, IPS
IAS, IPSsarkarnama

गेल्या दोन महिन्यांत काही ‘आयएएस’ अधिकारी आणि ‘आयपीएस’ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. त्यातही गोंधळ झाल्याने काही अधिकाऱ्यांच्या दोन ते वेळा बदल्या करण्यात आल्या. त्यातूनही प्रशासनात नाराजी उमटली.

शिंदे-फडणवीसांकडे चकरा मारून काही अधिकाऱ्यांनी महत्त्वाच्या पदांसाठी ‘फिल्डिंग’ लावली. त्यावरील बदल्यांच्या चर्चेदरम्यान शिंदे आणि फडणवीस यांच्यात मतभेद असल्याची चर्चा होती. त्यामुळे सरकार बदलून ४ महिने होत आली तरी आयएएस आणि आयपीएसच्या बदल्या पूर्ण होऊ शकल्या नाहीत.

ठाकरे सरकारचे अनेक निर्णय रद्द केल्यानंतर त्याच्या सत्तेच्या काळातील आणि विशेष करून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस नेत्याच्या जवळचे अधिकारी बदलण्याची भूमिका घेतली. त्यात राज्याच्या बहुतांश भागात आपल्या जवळचे अधिकारी नेमून प्रशासनावर वर्चस्व ठेवण्याचाही प्रयत्न आहे. त्याचवेळी आपल्या सत्तेतील आणि ठाकरे सरकारमधील साइड पोस्ट दिल्या गेलेल्या अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या पदावर आणण्याची फडणवीसांची भूमिका आहे.

Deputy Cm Devendra Fadanvis-Cm Eknath Shinde
Naresh Mhaske :..राजकुमार आता घराबाहेर पडले ! ; म्हस्केंचा आदित्य ठाकरेंना टोला

महाविकास आघाडी सरकारमधील प्रशासकीय अधिकाऱ्यांना बाजूला करून प्रशासनावर आपले ‘राज’ आणण्याचा प्रयत्न करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दुसऱ्या बाजूला प्रशासनावर मजबूत पकड ठेवण्याचा प्रयत्न करणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात अखेर ‘आयएएस आणि आयपीएस’अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत एकमत झाल्याचे समजते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com