पंतप्रधानपदाची गरिमा घालवणाऱ्या भाजपविरोधात बोलणारच : पटोले

पंतप्रधान Priminister ज्या रस्त्याने जाणार तिथे भाजपचे कार्यकर्ते BJP Supporter कसे पोहचले, या प्रश्नांची उत्तरे मिळाली पाहिजेत, असे पटोले Nana Patole म्हणाले
Nana Patole
Nana Patolesarkarnama

मुंबई : पंतप्रधानपदाची गरीमा घालवण्याचे काम भारतीय जनता पक्ष करत आहे. त्याविरोधात आम्ही बोलणारच. माझ्याविरुद्ध तक्रारी झाल्या तरी चालतील, असे प्रत्युत्तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना दिले.

यासंदर्भात बोलताना पटोले म्हणाले की, मी काल आणि आजही बोललो, पंतप्रधानपदाची गरीमा आहे. जे पंजाबमध्ये घडले त्याचा आम्ही निषेधच करतो. पण, जो कार्यक्रम आधी पाठवला होता तो शेवटच्या क्षणी का बदलला हा पश्न आहे.

Nana Patole
'पंतप्रधान मोदींच्या केसालाही धक्का लागू शकत नाही'; पाहा व्हिडिओ

केंद्रीय सुरक्षा विभागाने पंतप्रधानांचा कार्यक्रम आणि रस्ता ऐनवेळी बदलणे हेच चुकीचे आहे. मग हा कार्यक्रम बदलणारे कोण आहेत. केंद्रीय सुरक्षा यंत्रणा याला जबाबदार आहेत. पंतप्रधान ज्या रस्त्याने जाणार तिथे भाजपचे कार्यकर्ते कसे पोहचले, या प्रश्नांची उत्तरे मिळाली पाहिजेत, असे पटोले म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in