Sharad Pawar News : राष्ट्रवादीची कमिटी जो निर्णय घेईल, तो मला मान्य असेल : राजीनाम्यानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

Sharad Pawar Resign: तुमच्या मनातील निर्णय ही कमिटी घेईल, असे अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना स्पष्टपणे सांगितले.
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama

मुंबई : तुमच्या भावना सर्वांना मान्य आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसबाबत (NCP) नेमलेली कमिटी जो निर्णय घेईल, तो मला मान्य असेल, असे शरद पवार (Sharad Pawar) यांनी सांगितले आहे. तुमच्या भावना, तुम्ही जी साद घातली आहे. ती आमच्या सर्वांच्या लक्षात आली आहे. तुमच्या मनातील निर्णय ही कमिटी घेईल, असे अजित पवार (Ajit Pawar) यांनी कार्यकर्त्यांना स्पष्टपणे सांगितले. (I will accept whatever decision NCP committee takes: Sharad Pawar's first reaction after resignation)

लोक माझे सांगाती भाग दोन या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. शरद पवार यांच्या राजीनाम्याच्या घोषणेनंतर यशवंतराव चव्हाण सभागृह राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी डोक्यावर घेतले आहे. पवार साहेब जोपर्यंत निर्णय मागे घेत नाहीत, तोपर्यंत आम्ही सभागृह सोडणार नाही, अशी भूमिका नेते,आमदार, खासदार आणि कार्यकर्त्यांनी घेतली आहे. स्वतः अजित पवार, प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील हे निर्णय मागे घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

Sharad Pawar
Sharad Pawar News : राष्ट्रवादीची कमिटी जो निर्णय घेईल, तो मला मान्य असेल : राजीनाम्यानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

अजित पवार म्हणाले की, तुमच्या भावना सर्वांना मान्य आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसबाबत नेमलेली कमिटी जो निर्णय घेईल, तो मला मान्य असेल, असे शरद पवार यांनी सांगितले आहे. तुमच्या भावना, तुम्ही जी साद घातली आहे. ती आमच्या सर्वांच्या लक्षात आली आहे. तुमच्या मनातील निर्णय ही कमिटी घेईल.

Sharad Pawar
Sharad Pawar Big Statement: 'मी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होणार; शरद पवारांची मोठी घोषणा

माझ्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची वाटचाल कशी असेल यासाठी एक समिती नेमण्यात आली आहे. त्यात प्रफुल्ल पटेल उपाध्यक्ष असतील. त्यात अजित पवार, छगन भुजबळ, पी. सी. चाको आणि इतर नेतेंडळी असतील, असे शरद पवार यांनी आपल्या भाषणात सांगितले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com