`मी सलग पाच वर्षे मुख्यमंत्री होतो... पवार साहेब नव्हते... `

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्यातील शाब्दिक युद्ध रंगले
`मी सलग पाच वर्षे मुख्यमंत्री होतो... पवार साहेब नव्हते... `
Sharad Pawar-Devendra Fadnavissarkarnama

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पत्रकार परिषद नेमकी कोणत्या कारणासाठी घेतली हेच कळत नसल्याचे नमूद करत महाराष्ट्रात हजारो कोटींचा भ्रष्टाचार मंत्री, अधिकारी आणि दलालांमार्फत चालतो याची चिंता पवारसाहेबांना वाटत नाही काय? असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.


पवारांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत उपस्थित केलेल्या प्रश्नांना फडणवीस यांनी गोव्यात पोहोचताच उत्तर दिले. ‘‘माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची चौकशी थांबवण्यास सर्वोच्च व उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे गैरव्यवहाराबाबत त्यांच्या चौकशीचे आदेश दिले असतील तर, त्यास विरोध करण्याचे कारणच नाही. चौकशीचा जो निर्णय झाला आहे तो कोणत्याही पक्षाच्या सरकारचा नाही, यंत्रणांचा आहे,’’ असे सांगत, ‘पवारसाहेब सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाचा नक्कीच आदर राखत असावेत असे मत फडणवीस यांनी व्यक्त केले.

Sharad Pawar-Devendra Fadnavis
'शरद पवार कधीच सलग पाच वर्षे मुख्यमंत्री राहिले नाहीत';पाहा व्हिडिओ

‘‘महाराष्ट्रात बदल्यांसाठी हजारो कोटींचा भ्रष्टाचार होत असल्याची प्रकरणे बाहेर येत असतील तर, पवारसाहेब अस्वस्थ कसे होत नाहीत, हा मला पडलेला प्रश्न आहे,’’ असेही ते म्हणाले.
मावळ येथील गोळीबाराची तुलना जालियनवाला बागेशी करणे अनुचित नव्हे हे सांगताना फडणवीस म्हणाले , ‘‘जालियनवाला बागेत गर्व्हनर जनरलने स्वत: गोळीबार केला नव्हता तर, आदेश दिले होते. मावळ येथेही राज्यकर्त्यांनीच शेतकऱ्यांवर गोळीबार करा असे आदेश दिले. त्यामुळे दोन्ही घटनांमध्ये साधर्म्य आहेच.’’

Sharad Pawar-Devendra Fadnavis
`सत्तेवर पुन्हा न आल्याची जखम फडणविसांना खोलवर झालीय...`

‘‘मी महाराष्ट्राचा सलग पाच वर्षे मुख्यमंत्री होतो, पवारसाहेब चार वर्षे मुख्यमंत्री होते पण सलग नव्हेत. अर्थात ते सलग पाच वर्षे मुख्यमंत्री असते तरी चांगलेच झाले असते. महाराष्ट्राचा विकास झाला असता,’’ असा टोलाही फडणवीस यांनी लगावला. ‘‘मी विरोधी पक्षनेता असूनही आनंदात आहे, याचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना वाईट वाटते,’’ असे उत्तरही त्यांनी दिले.
उत्तरप्रदेशात जे घडले ते दुर्दैवी आहे. या घटनेची चौकशी सुरु आहे पण मंत्र्याच्या मुलाला अटक झाली आहे.नातेवाईकांवर आरोप झाला म्हणून मंत्री राजीनामा देतात असे कसे घडेल असेही ते म्हणाले.लखीमपूरमधील त्या घटनेचा निषेध करण्यासाठी आयोजित केलेला बंद हा पोलिसांच्या संरक्षणात धाकदपटशाने झाला.

Related Stories

No stories found.