'त्यावेळी मी ६ वर्षांचा होतो...';पक्ष स्थापनेच्या आठवणीत मु्ख्यमंत्री उद्धव ठाकरे भावूक

Shivsena| CM Uddhav Thackeray| माझा पक्षच पितृपक्ष आहे, कारण माझ्या फादरनेच शिवसेनेला जन्म दिला
'त्यावेळी मी ६ वर्षांचा होतो...';पक्ष स्थापनेच्या आठवणीत मु्ख्यमंत्री उद्धव ठाकरे भावूक
CM Uddhav Thackeray

मुंबई : माझा पक्षच पितृपक्ष आहे, कारण माझ्या फादरनेच शिवसेनेला जन्म दिला. 56 वर्षांपूर्वी जेव्हा शिवसेना स्थापन होत होता तो क्षण मनात आठवून गेला. अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना स्थापनेच्या आठवणींना उजाळा दिला. (CM Uddhav Thackeray Latest news update_

मुख्यमंत्री शिवसेना आमदारांना ठेवण्यात आलेल्या हाॅटेल वेस्ट इनमध्ये बोलत होते. शिवसेना स्थापनेवेळी मी 6 वर्षांचा होतो. माझ्यासमोर शिवाजी महाराज की जय म्हणत नारळ फोडला. त्यावेळी नाराळच्या पाण्याचे शिंतोडे माझ्यावर उडाले होते, आज स्वप्नातही वाटलं नव्हतं ते शिंतोंडे मला भिजवून टाकतील. तेव्हा जबाबदारी काय असते हे कळलं नाही. पण जेव्हा मी शिवसेना भवनात पहिल्यांदा पक्ष प्रमुखाची जबाबदारी हातात घेतली त्यावेळी मला जबाबदारी काय असते हे कळलं

CM Uddhav Thackeray
राष्ट्रवादीचे आमदार मोहितेंची नाराजी कायम; मतदान काही तासांवर तरीही मुंबईत पोचले नाहीत!

गेल्या 56 वर्षांत अनेक संकटे आली पण शिवसेना कणखरपणे उत्तर देत आली आहे आणि देत राहील. पक्षासाठी वार झेलणाऱ्यांना विनम्र अभिवादन, गेल्या जीवाला जीव देणारे शिवसैनिक मिळाळे त्यांच्याच जीवावर शिवसेना उभी राहिली. 56 वर्षात शिवसैनिकांनी रक्ताचं पाणी केलं, घाम गाळला, त्यांच्यामुळे आज ही शिवसेना उभी आहे. असे म्हणत सर्व शिवसैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

सुभाष देसाई आणि दिवाकर रावते यांच कौतुक

आज मुख्यमंत्री आणि पक्ष प्रमुख म्हणून मी तुमच्यासमोर बसलो. पक्षाची स्थापना झाल्यानंतर शिवसेनेचा महापौर आणि नगरसेवक निवडून आणणं हेच खूप कठीण होतं. पण, आज मंत्री, आमदार, नगरसेवक आपले आहे, मुख्यमंत्री आपला आहे. पण या सर्वात सुभाष देसाई आणि दिवाकर रावते कायम आपल्यासोबत आहे. सुभाष देसाई, दिवाकर रावते पक्षप्रमुखांपासून सोबत आहेत. पण विधआन परिषदेची उमेदवारी दिली नाही तरी कोणताही रुसवा फुगवा नाही, त्यांना जी जाबाबदारी दिली ती त्यांनी यशस्वी केली. असं म्हणत दिवाकर रावते आणि सुभाष देसाई यांचं कौतुक केलं. हे वयाने माझ्यापेक्षा मोठे पण बाळासाहेबांनतर पक्षप्रमुख म्हणून माझ्या शब्दाला मान देतात. दिवाकर रावते आणि सुभाष देसाईंना निवृत्त होऊ देणार नाही.मला तुमची गरज आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in