विनोद निकोले म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन व पक्ष आदेशानुसार केले मतदान

राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सहा जागांसाठी आज मतदान प्रक्रिया विधानसभेत सुरू आहे.
विनोद निकोले म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन व पक्ष आदेशानुसार केले मतदान
MLA Vinod Nikole Latest Marathi NewsSarkarnama

मुंबई - राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सहा जागांसाठी आज मतदान प्रक्रिया विधानसभेत सुरू आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान केले. हे मतदान महाविकास आघाडीने का केले. याबाबतची भूमिका माकपचे डहाणूतील आमदार विनोद निकोले यांनी स्पष्ट केली. ( I voted as per the assurance given by the Chief Minister and the party order )

माकपचे आमदार विनोद निकोले यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. महाविकास आघाडीच्या बाजूने त्यांनी मतदान केलंय. या बाबत विनोद निकोले यांनी सांगितले की, राज्यसभेच्या मतदानाच्या दोन दिवसापूर्वी माकपच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली होती. मला असे निर्देश होते की, देशाचे वातावरण आहे, की खासगीकरणाचा सपाटा लावला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील संस्था विकल्या जात आहेत. शेतकरी व कामगार यांच्या विरोधात केंद्र सरकार धोरण राबवित आहे. अनेक तरूण असे आहेत, ज्याच्याजवळ पदवी असूनही हाताला काम नाही. मागील एक वर्षभर दिल्लीत शेतकरी आंदोलन झाले. ही परिस्थिती देशात निर्माण झाली म्हणून आमच्या पक्षाने महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला, असे त्यांनी सांगितले.

MLA Vinod Nikole Latest Marathi News
`माकप` नेत्याच्या उपस्थितीतच सदस्यांचा `राष्ट्रवादी`त प्रवेश सोहळा

ते पुढे म्हणाले की, आम्ही माकपचे आमदार असल्याने घोडेबाजार हा विषयच येत नाही. 2019ला ज्यावेळी विधानसभा निवडणूक झाली त्यावेळी मी एकमेव आमदार होतो. जो शेतकऱ्यांच्या बांधावर फिरत होतो. मी कालपर्यंत माझ्या मतदार संघातच होतो. आज मतदानासाठीच केवळ मी मुंबईत आलो आहे. मी मुंबईत हॉटेलमध्ये थांबलेलो नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

MLA Vinod Nikole Latest Marathi News
दिंडोरी मतदारसंघात 'माकप'च्या गावितांच्या मदतीला 'मनसे' अन्‌ छावा

घोडेबाजार या विषयापासून मी फार लांब आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीबाबतही आमच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल. त्यानुसार आम्ही अंमलबजावणी करू. माझ्या संपर्कात महाविकास आघाडीचे कोणीही नव्हते. पक्षाने महाविकास आघाडीला मतदान करण्याचे आदेश दिल्यावर मी स्वतःच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटलो. मुख्यमंत्री यांनी विकासनिधी वाढवून देतो, असे आश्वासन दिल्यानंतर पक्षश्रेष्ठींनी दिलेल्या आदेशानुसार हे मतदान महाविकास आघाडीला केल्याची भूमिका निकोले यांनी मांडली आहे, असे निकोले यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in