खैरे म्हणतात, ''मला अजूनही खासदार असल्यासारखे वाटतयं..''

पक्षांतर्गत विरोधक खैरे संपले असे म्हणत असले तरी मुंबईतील नेत्यांमध्ये खैरे यांचा वावर अजूनही तसाच आहे.
Chandrakant Khaire
Chandrakant Khairesarkarnama

औरंगाबाद : शिवसेना (ShivSena)नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) हे गेल्या 2019 च्या लोकसभा निवडणुकीत अवघ्या साडेचार हजार मतांनी पराभूत झाले. सलग चार टर्म खासदार राहिलेल्या खैरे यांचा हा पराभव स्वतः त्यांना शिवसेनेतील अनेकांना जिव्हारी लागला होता. या पराभवाला आता तीन वर्ष उलटली आहेत तरी देखील खैरे हे ''या जिल्ह्याचा खासदार मीच आहे, लोकांच्या मनातला खासदार मीच,'' असं नेहमी सांगतात.

राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी वैजापुरात पार पडलेल्या विविध विकास कामांच्या उद्घाटन व लोकार्पण सोहळ्यात चंद्रकांत खैरे यांनी पुन्हा एकदा मला अजूनही खासदार असल्यासारख वाटतयं असे म्हणत धमाल उडवून दिली. एमआयएमचे खासदार इमतियाज जलील यांच्याकडून अनपेक्षित झालेला पराभव खैरे अजूनही पचवू शकलेले नाहीत. परंतु पराभवानंतर घरात बसून राहतील ते खैरे कसले.

Chandrakant Khaire
इम्रान यांचे अनेक कारनामे समोर ; पंतप्रधान शाहबाज यांच्याकडून अनेक गुपितं उघड

पराभवानंतर देखील खैरे यांचा दिनक्रम हा ते खासदार असताना जसा होता तसाच राहिला. जनसंपर्क आणि त्यांच्या निवासस्थान व कार्यालयातील गर्दी आजही कायम आहे. पक्षातर्गत विरोध पचवत खैरे यांनी संपूर्ण जिल्हा पिंजून काढला आहे. याशिवाय संपर्क नेते म्हणून जबाबदारी असलेल्या लातूर बीडमध्ये देखील ते विविध कार्यक्रम घेऊन पक्ष बळकट करताना दिसतात.

औरंगाबाद जिल्ह्यात (Aurangabad)पक्षांतर्गत विरोधक खैरे संपले असे म्हणत असले तरी मुंबईतील नेत्यांमध्ये खैरे यांचा वावर अजूनही तसाच आहे. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा आपल्याला उमेदवारी मिळेल आणि आपले पुनर्वसन होईल अशी अपेक्षा खैरे व त्यांचे समर्थक बाळगुन आहेत.

Chandrakant Khaire
मुंबईत दंगली घडाव्यात हा भाजपचा उद्देश होता का ? राष्ट्रवादीचा सवाल

मराठवाड्यातील शिवसेनेचे नेते म्हणून जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येक नेत्यासोबत खैरे हे आवर्जून उपस्थित असतात. मातोश्री आणि मुंबईतील नेत्यांची अजूनही त्यांचा संवाद कायम आहे. गेल्या लोकसभा निवडणूक पराभव झाल्यामुळे स्वतःला सक्रिय ठेवत खैरे यांनी आपला उमेदवारीवरचा दावा कायम राहावा असे प्रयत्न सातत्याने सुरू ठेवले आहेत.

वैजापूरच्या कार्यक्रमांमध्ये गेल्या चार लोकसभा निवडणुकीत त्यांना या तालुक्यातून मिळालेल्या मताधिक्यची आवर्जून आठवण सांगत त्यांनी वैजापूर करांची ऋण व्यक्त केले. एवढेच नाही तर एकनाथ शिंदे यांच्याकडे वैजापूरच्या विकासासाठी अतिरिक्त निधीची मागणी केली.

यावेळी बोलताना खैरे यांनी आपल्याला अजूनही खासदार असल्यासारखे वाटते असे म्हणत आपल्या मनातील सुप्त इच्छा बोलून दाखवली त्यामुळे पक्षातील त्यांच्या विरोधकांना निश्चितच धडकी भरली असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in