अजितदादा संतापले : इतक्या खालच्या पातळीवरच राजकारण कधी पाहिलं नाही..`

विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांची शिंदे सरकारवर कठोर टीका
Ajit pawar Latest Marathi News, NCP News, Political News
Ajit pawar Latest Marathi News, NCP News, Political NewsSarkarnama

मुंबई : विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्य सरकारवर आज टिकेची झोड उठवली. वर्षभरापूर्वी मंजूर केलेल्या कामांनाही सरकारने स्थगिती दिल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत इतक्या खालच्या पातळीवरच राजकारण या आधी कधी पाहिलं नाही, अशा शब्दांत संताप व्यक्त केला.

वढू येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या कामाला सरकारने स्थगिती दिली. तसेच जिल्हा नियोजन समित्यांनी मंजूर केलेल्या कामांना थांबविले. सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित केल्या, अशी उदाहरणे देत अजित पवार यांनी सरकारचे हे खालच्या पातळीवरचे राजकारण आहे. एकनाथ शिंदे हे आमच्यासोबत या आधी मंत्रीमंडळात होते. तेच आता या कामाला स्थगिती देत आहेत. दिलीप वळसे पाटलांच्या भीमाशंकर कारखान्याच्या दोन जागांसाठी दोन दिवसांवर मतदान असताना निवडणुकीला स्थगिती दिली. खरे तर निवडणूक कार्यक्रम सुरू असताना त्यात हस्तक्षेप करता येत नाही. तरी सरकारने तो निर्णय घेतला. जिथे निवडणूक प्रक्रिया सुरू आहे, त्या पूर्ण होऊ द्या, असे आम्ही सांगितले. तरी सरकारने आपला निर्णय बदलला नाही, असे पवार यांनी स्पष्ट केले.

ही कामे काही आमची वैयक्कित नव्हती. 2021 पासूनची कामे थांबवली आहेत, हे न कळणारे असल्याचे स्पष्ट मत अजितदादांनी व्यक्त केले.

महाविकास आघाडी सरकार असताना राष्ट्रवादी काॅंग्रेसने निधीवाटपात अन्याय केल्याची तक्रार असल्याने सरकार असे निर्णय घेत असल्याचे सांगितल्यावर अजित पवार म्हणाले की किती शिळ्या कढीला ऊत आणताय? सारखं आपलं तेच तेच. तुम्हाला जायचे (शिवसेना सोडून) होते म्हणून काहीतरी मुद्दे मांडत आहात. विधानसभेने मंजूर केलेल्या अर्थसंकल्पानुसार निधीचे वाटप झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यास मंजुरी दिली होती. तरी आपले सारखे तेचतेच सांगितले जात असल्याची नाराजी पवार यांनी व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com