Jayant Patil ED Enquiry: मला माहित आहे कशासाठी चौकशी होतेय; जयंत पाटलांनी कारणच सांगितलं

Jayant Patil Enquiry : राज्यभरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक
Jayant Patil
Jayant PatilSarkarnama

Jayant Patil News: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना सोमवारी (ता. १५ मे) सक्तवसुली संचलनालयाने (ED) नोटीस पाठवली होती. त्यानुसार त्यांची इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस (आयएल अॅण्ड एफएस) गैरव्यवहारप्रकरणी चौकशी करण्यात येणार आहे. या चौकशीसाठी पाटील आज (ता. २२ ) ईडी कार्यालयात उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, चौकशीसाठी 'ईडी' कार्यालयात जाण्यापूर्वी जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. त्यात त्यांनी चौकशीचे कारण सांगितले.

पाटील 'ईडी' कार्यालयात उपस्थित राहण्यापूर्वीच त्यांच्या समर्थकांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई कार्यालयाबाहेर ठिय्या मांडला. त्यावेळी जयंत पाटील (Jayant Patil) यांनी कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन केले. पाटील म्हणाले, "समन्स आल्यापासून राज्यभरातून माझ्या पक्षातील व इतर मित्र पक्षांतील पदाधिकाऱ्यांचे फोन येत आहेत. राज्यभरातून लोक 'ईडी' कार्यालयाबाहेर येत असल्याचे मला समजत आहे. कार्यकर्त्यांनी शांतता राखावी. माझी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांना विनंती आहे की, कोणीही मुंबईला येऊ नये." (Marathi Latest News)

Jayant Patil
Jayant Patil ED Summons: जयंत पाटलांना दुसऱ्यांदा ईडी'च समन्स

यावेळी पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतना चौकशीचे कारण सांगितले. जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले, "ही कायदेशीर प्रक्रिया आहे. त्यामुळे घाबरण्याचे काही कारण नाही. मला जी माहिती असेल ती मी चौकशीदरम्यान 'ईडी'ला देणार आहरे. मला माहिती आहे का चौकशी होतेय ती. मात्र ईडी ज्या कंपनीचे नाव घेतेय त्या आयएल अॅण्ड एफएस या कंपनीशी माझा जीवनात संबंध आलेला नाही. दरम्यान, मी या चौकशीकामी 'ईडी'ला पूर्णपणे सहकार्य करणार आहे."

Jayant Patil
BJP Leaders Flex in Pune: भाजप नेत्यांना पोस्टरबाजी महागात पडली; महापालिकेने दंडाची नोटीसच धाडली...

जयंत पाटील राज्याचे माजी गृह आणि माजी अर्थमंत्री आहेत. तसेच ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) प्रदेशाध्यक्ष आहेत. सातवेळा ते आमदार म्हणून निवडून आले आहेत. आता इस्लामपूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत. त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर 'ईडी' (ED) आणि भाजापविरोधात ठिय्या आंदोलन छेडले आहे. तसेच जयंत पाटलांच्या नावाने घोषणाबाजी करीत आहेत. जयंत पाटलांच्या मुंबईतील घराबाहेर बॅनरही लावले आहेत. जंयत पाटील यांच्या चौकशीमुळे राज्यभरातून राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com