मी अगदी शेवटच्या क्षणीही त्यांना विचारलं होतं...; उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट

CM Eknath Shinde| Uddhav Thackeray| शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीचा आज दुसरा भाग प्रदर्शित झाला.
CM Eknath Shinde| Uddhav Thackeray|
CM Eknath Shinde| Uddhav Thackeray|

मुंबई : ' मी त्यांना मी अगदी शेवटच्या काळातही त्यांना विचारले होते की, तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं आहे का? त्यांनी नीट सांगितले असते तर, गेलो असतो आणि काँग्रेस-राष्ट्रवादीला जाऊन सांगितल असतं की माझी लोकं तुमच्यासोबत काही आनंदाने राहायला तयार नाहीत. पण त्यांच्यात तेवढी हिंमत नव्हती, त्यांच्याकडे काही कारणेच नव्हती, रोज वेगळी कारणे देत आहेत. असा गौप्यस्फोटच शिवसेनेचे (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केला आहे.

दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीचा आज दुसरा भाग प्रदर्शित झाला. 'विश्वासघातक्यांनी शेवटच्या काळात जरी येऊन सांगितले असते तरी सगळे सन्मानाने केले असते. अगदी शेवटच्या काळात सुद्धा मी या विश्वासघातक्यांना तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचे आहे का? असे विचारलेही होते. ठीक आहे, आपण बोलू काँग्रेस-राष्ट्रवादीशी. भाजपसोबत जायचे आहे का, तर भाजपकडून या दोन-तीन प्रश्नांची उत्तरं मिळू द्या. आपण काँग्रेस-राष्ट्रवादीला जाऊन सांगू की माझी लोकं तुमच्यासोबत काही आनंदाने राहायला तयार नाहीत. पण त्यांच्यात तेवढी हिंमत नव्हती. रोज नवी कारणं पुढे येत आहेत.' अशी टीका ठाकरेंनी थेट शिंदेंवर केली. खरतंर माझी मुख्यमंत्रीपद स्वीकारायचीच इच्छा नव्हती. पण तेव्हा एका जिद्दीने मी ते केले, मी इच्छेने मुख्यमंत्री नाही झालो, तर एका जिद्दीने मुख्यमंत्री झालो. जिद्दीच्या बळावर अडीच वर्षांच्या काळात माझ्या परीने कारभार केला, असंही ठाकरे म्हणाले.

CM Eknath Shinde| Uddhav Thackeray|
Shiv sena : शरद पवारांनी शिवसेना फोडली का ? उद्धव ठाकरेंनी दिलं उत्तर..

पण काँग्रेस धोका देणार आणि पवारसाहेबांवर तर अजिबातच विश्वास ठेवता येणार नाही, असं मला सातत्याने असे भासवलं जात होतं. तेच तुम्हाला पाडतील असे सगळे सांगायचे. अजित पवारांबद्दलही माझ्याकडे येऊन बोलायचे. पण माझ्याच माणसांनी विश्वासघात केला. मग सभागृहात एका जरी माणसाने माझ्याविरोधात मत दिलं असतं तर ते माझ्यासाठी लज्जास्पद होतं' असा खुलासाही उद्धव ठाकरेंनी केला.

मीही अडीच वर्षे मुख्यमंत्री होतो. आज नाही, पहिल्यासारखाच आजही तुमच्यासमोर बसलो आहे. काय फरक पडला? सत्ता येत-जात असते. पण माझ्यासाठी असली-नसली तरी फरक पडत नाही. दिवंहत अटलबिहारी वाजपेयीजी एकदा बोलले होते, 'सत्ता आती है, जाती है. लेकीन देश रहना चाहिये.' देश राहण्यासाठी सगळ्या पक्षांनी मिळून काम करायला हवे, आपणच देशासाठी काम नाही केले तर आपणच आपल्या देशाचे शत्रू आहोत. कारण आजही देशाला अनेक प्रश्न भेडसावत आहेत. सध्या रुपयाची किंमत ढासळली आहे. महागाईने उच्चांक गाठलाय. बेरोजगारी वाढली आहे. अशा सगळ्या गोष्टींकडे कुणाचे लक्ष नाही, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com