Death Threat To Sharad Pawar: मी धमकीची चिंता करत नाही; धमकी आल्यानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

Sharad Pawar News: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी आल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama

Supriya Sule Meets Mumbai Police Commissioner: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तसेच ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत व आमदार सुनील राऊत यांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

शरद पवार यांना एका ट्विटर अकाऊंटवर ही धमकी देण्यात आली आहे. या धमकीनंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे. तर या धमकीनंतर शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. "धमकीची चिंता मी करत नाही. धमक्या देऊन कुणी आवाज बंद करू शकत नाही", असं ते म्हणाले.

Sharad Pawar
Saurabh Pimpalkar with BJP Leaders: पवारांना धमकी देणाऱ्या पिंपळकर'चे भाजप नेत्यांसोबतचे फोटो व्हायरल...

शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी आल्यानंतर त्यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला. पवार म्हणाले, "धमकीची मी चिंता करत नाही. सरकारची कायदा सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी आहे. राज्याची कायदा सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी ज्यांच्याकडे आहे, त्यांनी त्या संबंधीची काळजी घ्यावी. ज्याच्या हातात सुत्र त्यांना ती जबाबदारी टाळता येणार नाही. धमक्या देऊन कुणी आवाज बंद करू शकत नाही", असं पवार म्हणाले.

दरम्यान, शरद पवार यांना ट्विटरवरुन धमकी देण्यात आल्यानंतर हा धमकी देणारा तरुण भाजपचा कार्यकर्त्या असल्याचं सांगितलं जात आहे. या धमकीप्रकरणाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेतली असून याबाबत त्यांनी ट्वीट केलं आहे.

काय आहे मुख्यमंत्र्यांचं ट्वीट?

"ज्येष्ठ नेते शरद पवार यांना ट्विटरवरुन आलेल्या धमकीची सरकारने गंभीर दखल घेतली असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी मी स्वतः बोललो आहे, तपासाच्या सूचना दिल्या आहेत. हे ज्येष्ठ नेते असून, त्यांच्याबदल आम्हा सर्वांनाच आदर आहे. त्यांच्या सुरक्षेची संपूर्ण काळजी घेतली जाईल. आवश्यकता असल्यास सुरक्षा व्यवस्थेत वाढही करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत", असं ट्वीट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com