मी फोन केला आणि बच्चू कडू गुवाहाटीला गेले- फडणवीसांचा गौप्यस्फोट

Devendra Fadanvis| बच्चू कडू आणि अमरावतीचे आमदार रवी राणा यांच्यातील वादाबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी हा खुलासा केला आहे.
Devendra Fadanvis
Devendra Fadanvissarkarnama

Devendra Fadanvis मुंबई : मी एक फोन केला आणि बच्चू कडू गुवाहाटीला गेले, असा धक्कादायक गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू आणि अमरावतीचे आमदार रवी राणा यांच्यातील वादाबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी हा खुलासा केला आहे.

माझ्याकडे पक्की माहिती आहे. जे आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीला गेले ते फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवून गेले. त्यांना हे माहिती होतं की आपल्याकडे बहुमताची संख्या नसेल तर आपलं पदही जाऊ शकतं हे त्यांना माहिती होतं तरीही ते त्यांच्यासोबत गेले असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. म्हणून काल मी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बच्चू कडू आणि रवी राणा यांना यांच्याशी चर्चा केली.

Devendra Fadanvis
DCC Bank Election : सोलापूरसह ६ जिल्हा बॅंकांबाबत सहकार मंत्री आठवड्यात घेणार मोठा निर्णय

रवी राणांनी आपण रागारागात बोलल्याचं कबुल केलं, मला कोणाला दुखवायचं नव्हतं पण बच्चू कडूंना माझ्या विरोधात वक्तव्य केलं म्हणून मी रागारागात असं वक्तव्य केलं. बच्चू कडूंनीही रागारागात आपण काही स्टेटमेंट केल्यांच मान्य केलं. दोघांनीही हे मान्य केलं की आम्ही रागारागात केलेले हे वक्तव्य योग्य नाहीत. दोघांनीही आता विकासासाठी काम करायचं ठरवल आहे. रवी राणांनीही हा विषय संपवला असल्याचं मान्य केलं आहे, बच्चू कडूंनीही या वादावर पडदा टाकला आहे.

गेल्या तीन-चार दिवसांपासून आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यातील शाब्दिक चकमकी झडत होत्या. आमदार बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यात जोरदार वाद सुरू होता. बच्चू कडू यांनी गुवाहाटीला जाऊन कोट्यवधी रूपये घेतले, असा आरोप रवी राणा यांनी केला होता. यावरुन दोघांमध्ये मोठा वादही पेटला होता.

हा वाद मिटवण्यासाठी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी रविवारी मध्यरात्री मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावरही तिघामंध्ये सविस्तर चर्चा झाल्यानंतर या रवी राणा यांनी माघार घेतली. तर कार्यकर्त्यांशी बोलून आपण पूढील भूमिका घेऊ असे कडू यांनी सांगितलं. मुख्यमंंत्री शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करुन हा वाद शांत केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in