मी रिक्षावाला.. मी मुख्यमंत्री.. रिक्षावाल्यांनी स्टिकर लावून मुख्यमंत्र्यांचं केलं स्वागत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज डोंबिवलीत येणार आहेत.
Dombiwali Latest News
Dombiwali Latest NewsSarkarnama

डोंबिवली : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज (ता.१३ नोव्हेंबर) डोंबिवलीत येणार असून विविध रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

दरम्यान, बाळासाहेबांची शिवसेनेकडून डोंबिवली शहरात मोठ्या प्रमाणात मुख्यमंत्र्यांच्या आगमनाचे बॅनर लावत वातावरण निर्मिती करण्यात आली आहे. तर काही रिक्षावाल्यांनी देखील मी रिक्षावाला, मी मुख्यमंत्री, असे स्टिकर आपल्या रिक्षाला लावून मुख्यमंत्री शिंदेंचं स्वागत करणार आहे. (Dombiwali Latest News)

Dombiwali Latest News
शहाजीबापू पाटलांना घेरण्याची उद्धव ठाकरेंची रणनीती : कट्टर विरोधकास पाठबळ!

मुख्यमंत्री शिंदे येत असल्याने डोंबिवलीतील काही रिक्षावाले एकवटले आणि त्यांनाी मी रिक्षावाला, मी मुख्यमंत्री, अशा आशयाचे स्टिकर लावत मुख्यमंत्र्यांना आपला पाठींबा दिला आहे. याबाबत डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे यांनी सांगितले की, एक रिक्षावाला मुख्यमंत्री झाल्याने त्यांना पाठींबा देण्यासाठी सर्व जणांनी मी रिक्षावाला मी मुख्यमंत्री असे स्टिकर लावत शिंदे यांचं स्वागत करण्यचं ठरवलं असल्याचे सांगत घोषणाही दिल्या यावळी माजी नगरसेवक रणजित जोशी, युवासेना अधिकारी सागर जेधे यांच्यासह सर्व रिक्षा युनियन पदाधिकारी आणि रिक्षा चालक उपस्थित होते.

Dombiwali Latest News
Supriya Sule : 'जे सत्य तेच दाखवलं पाहिजे : विरोधी सिनेमे खपवून घेतले जाणार नाही'

दरम्यान,शिवसेनेसोबत बंडखोरी केल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी बंडखोर आमदारांचा पाठिंबा आणि भाजपच्या साथीने राज्यात नवं सरकार स्थापन केलं आहे. त्यानंतर महाविकास आघाडीकडून शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर जोरदार टीका केली. तर ठाकरे गटाकडून त्यांना रिक्षावाला म्हणूनही हिनवण्यात आलं होतं. त्याचमुळे या रिक्षावाल्यांनी मी रिक्षावाला मी मुख्यमंत्री, असे स्टिकर लावून शिंदेंना पाठिंबा दिल्याचे सांगितले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com