पुन्हा हुर्रर्र.. व्हावे अशी आशा... ठाणे जिल्ह्यातील बैलगाडा मालक राज ठाकरेंना भेटणार

बैलगाडा शर्यत ही कोणत्याही पक्षाची नाही. सर्व आमदारांना भेटून याविषयी निवेदन देणार आहोत. तसेच राज ठाकरे यांची भेट घेणार आहोत.
पुन्हा हुर्रर्र.. व्हावे अशी आशा... ठाणे जिल्ह्यातील बैलगाडा मालक राज ठाकरेंना भेटणार
Hurray again .. hope to happen ... will meet bullock cart owner Raj Thackeray in Thane district

डोंबिवली : बैलगाडा शर्यतीची जुनी परंपरा असून गेले चार वर्षे बंद असलेली बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू व्हावी, यासाठी ठाणे जिल्ह्यातील बैलगाडा मालक मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत. सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेली सुनावणी लवकर केली जावी अशी मागणी हे गाडामालक राज यांना करणार आहेत. Hurray again .. hope to happen ... will meet bullock cart owner Raj Thackeray in Thane district

गावातील जत्रा - यात्रांमध्ये बैलगाडा शर्यत ही आकर्षण असते. घाटात, मैदानात सर्वात कमी सेकंदात अंतर पार करणारी खिलारीची बैलजोडी म्हणजे गाडा मालकांची शान असते. परंतु, सध्या ही बैलगाडा शर्यत बंद असल्याने जत्रा यात्रेतील घाटाची ती रयाच गेली आहे. न्यायालयात याची सुनावणी झाली नसल्याने ही बंदी कायम आहे. राज्यात सध्या बैलगाडा मालक यामुद्यावरून आक्रमक झाले आहेत. 

ठाणे जिल्ह्यातील बैलगाडा मालकांची नुकतीच एक बैठक पार पडली आहे. त्यानंतर त्यांनी मनसे आमदार राजू पाटील यांची भेट घेत बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू करण्यासाठी पाठपुरावा करावा अशी विनंती केली. तसेच मनसे पक्ष प्रमुख राज ठाकरे यांची यासंदर्भात भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली. यावेळी संदीप माळी, सुनील मुंढे, महेश खोरे, दीपेश पाटील यांसह अनेक बैलगाडा मालक उपस्थित होते. आमदार पाटील यांनी बैलगाडा मालकांची राज ठाकरे यांच्याशी भेट घडवून आणण्याचे आश्वासन यावेळी गाडा मालकांना दिले. 

बैलगाडा शर्यतीसाठीचा खिलार जातीच्या देशी बैलांचा वापर शेतीकामासाठी केला जात नाही. त्यामुळे बैलगाडा शर्यती बंद झाल्याने खिलार जातीच्या देशी बैलांचा सांभाळ करणे शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. परिणामी या बैलांची कमी दराने विक्री होऊन त्यांची रवानगीअनधिकृतपणे कत्तलखान्यात होत आहे. या सर्वांचा एकत्रित परिणाम खिलार जातीच्या बैलांच्या वंशावर होत असून ही जात नष्ट होईल अशी भिती निर्माण झाली आहे. 

बैलगाडा शर्यत ही कोणत्याही पक्षाची नाही. सर्व आमदारांना भेटून याविषयी निवेदन देणार आहोत. तसेच राज ठाकरे यांची भेट घेणार आहोत. एक देश एक कायदा हवा, बैलगाडा शर्यत बंदी वरील सुनावणी होऊन याला एक खेळाचा दर्जा दिला जावा अशी आमची मागणी असल्याचे बैलगाडा मालक संदीप माळी यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.