असंही सेलिब्रेशन...शंभरी पार केलेल्या आजीबाईंनी वाढदिवशीच घेतली कोरोनाची लस

देशभरात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू आहे. या टप्प्यात ज्येष्ठ नागरिकांना लस दिली जात आहे.
hundred years old parvati khedkar takes covid 19 vaccine jab
hundred years old parvati khedkar takes covid 19 vaccine jab

मुंबई : देशात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. या टप्प्यात ज्येष्ठ नागरिकांना कोरोना लस देण्यात येत आहे. मुंबईतील एका आजीबाईंनी शंभराव्या वाढदिवशी कोरोनाची लस घेतली आहे. त्यानंतर त्यांनी वाढदिवसाचा केक कापून सेलिब्रेशन केलं त्यांनी वाढदिवशी केलेल्या या अनोख्या सेलिब्रेशनचे सगळीकडून कौतुक होत आहे. 

जगातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरणास 16 जानेवारीला देशात सुरवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन झाले होते. केंद्र सरकारने लस देण्याचा प्राधान्यक्रम ठरवला आहे. यात पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, कोरोनाच्या आघाडीवर लढणारे पोलीस, नागरी सुरक्षा कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचारी यांचा समावेश होता. 

लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ही लस 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना दिली जात आहे. तसेच, मधुमेह आणि उच्च रक्तदाबासह इतर आजार असलेल्या 45 वर्षांवरील रुग्णांचाही यात समावेश आहे. सरकारी रुग्णालयात ही लस मोफत मिळेल मात्र, खासगी रुग्णालयात यासाठी 250 रुपये मोजावे लागतील. यात 100 रुपयांच्या सेवा शुल्काचा समावेश असेल, असे सरकारने जाहीर केले आहे.  

महाराष्ट्रात लसीकरण केंद्रावर ज्येष्ठ नागरिकांची मोठी गर्दी आता झालेली दिसत आहे. मुंबईतील पार्वती खेडकर या आजीबाईंनी वाढदिवशी कोरोना लस घेऊन तो साजरा केला. पार्वती यांचा जन्म 5 मार्च 1921 रोजीचा आहेत. त्यांनी बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समधील लसीकरण केंद्रात 5 मार्चला लस घेतली. याच दिवशी त्यांचा शंभरावा वाढदिवस होता. लस घेतल्यानंतर त्यांनी केक कापून वाढदिवस साजरा केला. त्यांचं हे सेलिब्रेशन कौतुकास पात्र ठरत आहे. अनेक जणांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 

देशभरात आतापर्यंत 1.94 कोटींहून अधिक नागरिकांना कोरोना लस देण्यात आली आहे. महाराष्ट्रात सध्या कोरोनाच्या अॅक्टिव्ह केस 90 हजार 55 आहेत. महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 21 लाखांहून अधिक आहे. रुग्णसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक आहे. 

सिरम इन्स्टिट्यूट ही कोव्हिशिल्ड या कोरोना लशीचे उत्पादन करीत आहे. ही लस ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेन्का यांनी विकसित केली आहे. दुसरी लस ही भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही आहे.  सध्या दोन कोरोना लशी उपलब्ध असून, आणखी सात कोरोना लशींवर काम सुरू असल्याचे सरकारने नुकतेच जाहीर केले होते. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com