कसा आहे भाजपचा 'मिशन मुंबई' मेगा प्लान? वाचा सविस्तर

Mumbai News : काॅग्रेस, राष्ट्रवादी आणि इतर पक्षातील बलाढ्य उमेदवारांना हेरून त्यांना भाजपची उमेदवारी देण्याचा प्रयत्न असणार आहे.
Amit Shaha News, Amit Shah in  Nashik, Nashik Latest Marathi News
Amit Shaha News, Amit Shah in Nashik, Nashik Latest Marathi NewsSarkarnama

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा नुकताच मुंबई दौरा झाला. अमित शहा (Amit Shah) यांच्या दौऱ्याच्या निमित्तान भाजपने (BJP) मुंबई महापालिकेचे रणशिंग फुंकले आहे. तसेच अमित शहा यांचे शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना जागा दाखवण्याचे पदाधिकाऱ्यांना आव्हान दिले. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आक्रमक भाषण यामुळे भाजप या निवडणुकीत आपले सर्वस्व पणाला लावणार असल्याचे सांगितले जात आहे. आता भाजपचा मुंबई महानगरपालिकेसाठी मेगा प्लॅन समोर येत आहे.

Amit Shaha News, Amit Shah in  Nashik, Nashik Latest Marathi News
तेरावा खासदार ठाकरेंची साथ सोडणार?

१५० जागांवर विजय मिळण्यासाठी ८२ + ३० + ४० चा फॉर्म्युला ठरल्याचे समजत आहे. सर्वप्रथम २०१७ च्या निवडणूकीत जिंकलेल्या ८२ जागा कशा राखल्या जातील याकडे अधिक लक्ष देण्यात येणार आहे. २०१७ मध्ये दुस-या क्रमांकावरची मते मिळालेल्या ३० जागा निवडून आणण्याकरता अधिक जोर लावण्यात येणार. उर्वरित ४० जागांमध्ये स्वबळावर निवडून येणाऱ्यांना पक्षाकडून विशेष प्राधान्य देण्यात येईल. स्वबळावर निवडून येणा-या काॅग्रेस, राष्ट्रवादी, इतर लहान पक्षातील उमेदवारांना हेरुन त्यांना भाजपमधून उमेदवारी देण्याचा प्रयत्न असणार आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं वर्चस्व असलेल्या वॉर्डातील असंतुष्टांना हेरुन तिथे मतविभागणी करण्याचा डाव ही भाजपचा असणार आहे. मुस्लिम, हिंदीभाषिक पट्ट्यात स्ववबळावर निवडून येणा-या शिवसेना आणि इतर पक्षातील उमेदवारांना आपलंसं करून, आपल्या पक्षासोबत घेण्यासाठी प्रयत्न असणार आहे. तसेच दहिहंडी, गणेशोत्सस, नवरात्र या सणांच्या माध्यमातून मतांची विशेषत: मराठी मतांची जोडणी करणं, अशा पद्धतीने भाजपने मुंबई महानगरपालिकेसाठी मेगा प्लॅन तयार केला आहे.

Amit Shaha News, Amit Shah in  Nashik, Nashik Latest Marathi News
जमीन दाखवण्याची भाषा करणाऱ्यांना अस्मान दाखवू; ठाकरेंचे जोरदार प्रत्युत्तर

महाविकास आघाडी सरकार कोसळल्यामुळे शिवसेनेच्या अडचणी वाढल्या आहेत. भाजप चे आव्हान आहेच मात्र, त्यातच शिंदे गटही पुढे असणार आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे. २५ वर्षाची सत्ता राखण्याचे आव्हान सेनेपुढे असणार आहे. तर भाजपने मुंबई महापालिका ताब्यात घेऊन शिवसेनेला विषेश उद्धव ठाकरे यांना धक्का देण्याची जोरदार तयारी केली आहे. मात्र, ही निवडणूक रंगतदार होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in