बाळासाहेब गेल्यानंतर शिवसेनेचं तिकीट घेतलंच कसं? परबांचा शिंदे गटाला सवाल

Anil Parab| बंडखोर आमदार खरी शिवसेना आमचीच आहे, असा दावा करत असताना अनिल परबांनी त्यांना सडेतोड उत्तर दिले आहे.
Anil Parab
Anil Parab

मुंबई : 'ज्या बाळासाहेबांचा आम्हाला वारसा लाभला आहे त्या शिवसेनेला कोणासमोर आपले खरेपण सिद्ध करण्याची गरज नाही. आता हळुहळु गोष्टी बाहेर येतीलच, आता कुठे भानगडी कळायला लागल्या आहेत. कोण म्हणत पन्नास कोटी दिले, कोण म्हणत १०० कोटी दिले पण जर आमदारांची किंमत पैशात व्हायला लागली तर तुमची हयात निघून जाईल, पण निष्ठा आणि लालच यांच्यातील लालच निघून गेले आणि निष्ठा इथे राहिली, अशा शब्दांत शिवसेना नेते अनिल परब (Anil Parab) यांनी बंडखोर आमदारांवर निशाणा साधला. मंगळवारी (१२ जुलै) मुंबईत आयोजित शिवसेना (Shivsena) मेळाव्यात ते बोलत होते.

अनिल परब म्हणाले, बंडखोर आमदार आता अनेक कारणे देत आहेत. पण गेल्या चार-पाच महिन्यांपासून हे कटकारस्थान सुरु आहे. या कटकारस्थानाला कोण-कोण आणि कसे बळी पडलेत ते हळुहळु बाहेर येईलच, पण बाळासाहेबांचा शिवसैनिक कोणत्याही कटकारस्थानाला, कोणत्याही प्रलोभनाला बळी पडणार नाहीत, कोणत्याही भितीला, आमिषाला बळी पडणार नाहीत, हा बाळासाहेबांचा खरा शिवसैनिक आहे.

Anil Parab
आमदार धानोरकर म्हणाल्या, नदीकाठावरील नागरिकांना तात्काळ इतरत्र हलवा…

आता हे लोक सांगतात की आम्ही बाळासाहेबांची शिवसेना घेऊन बाहेर पडलो, मग बाळासाहेबांनी तुम्हाला सांगितलं होत का की पन्नास कोटी घ्या आणि शिवसेना सोडा म्हणून, मग २०१२ ला बाळासाहेब गेल्यानंतर तुम्ही २०१४ ला शिवसेनेचं तिकीट घेतलंच कसं, आता शिवसेना बाळासाहेबांची राहिली नाही, तरआम्हाली तिकीटही नको असे तेव्हाच का नाही बोललात, असा सवाल अनिल परब यांनी बंडखोर आमदारांना केला.

२०१९ लाही बाळासाहेबांची शिवसेना नव्हती. महाविकास आघाडीचं सरकार आले, त्यावेळीही भांडून भांडून मंत्रीपद घेतली. जे काय करायचं होतं ते सगळे धंदे केले. पण त्यावेळी कोणालाही ही बाळासाहेबांची शिवसेना नाही, असं वाटलं नाही, ज्यावेळी पाठीत खंजीर खुपसायची वेळ आली, त्यावेळी तुम्हाल आठवलं ही बाळासाहेबांची शिवसेना नाही, हिंदूत्त्वाची शिवसेना नाही. बाळासाहेबांचा जातानाचा व्हिडीओ बघा, जसं तुम्ही मला सांभाळलं तस माझ्या उद्धव आणि आदित्यला सांभाळा, असे सांगितलं, अस म्हणत अनिल परबांनी बंडखोरांचा समाचार घेतला. शिवसेना ही बाळासाहेबांची आहे, शिवसेना दूसऱ्या कोणाची होऊ शकत नाही, कोणीही शिवसेनेला हात लावून शकत नाही, अशा परखड शब्दांत त्यांनी बंडखोर आमदारांना खडसावलंही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in