
BMC News : मुंबई महापालिका (BMC) मुख्यालयातील सर्व राजकीय पक्षांची कार्यालये सील करण्यात आली आहेत. बीएमसी आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. 28 डिसेंबर रोजी शिवसेनेच्या ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला.
आमचीच शिवसेना खरी असल्याचा दावा करत शिंदे गटाने हे कार्यालय ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आयुक्त चहल यांनी ही कारवाई केली आहे. पण अशा परिस्थितीत राजकीय पक्षांना बीएमसी मुख्यालयात कार्यालय मिळवण्यात इतका रस का आहे, बीएमसीमध्ये कोणत्या पक्षांची कार्यालये आहेत आणि बीएमसी राजकीय पक्षांना कार्यालये कशाच्या आधारे देत आहेत, असा प्रश्न उपस्थित होतो.
बीएमसीमध्ये असे काय आहे?
सध्या बीएमसीमध्ये ५ राजकीय पक्षांची कार्यालये आहेत. यामध्ये शिवसेना, भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष (NCP) आणि समाजवादी पक्ष (SP) यांचा समावेश आहे. सर्व कार्यालये त्याच्या जुन्या इमारतीच्या तळमजल्यावर आहेत. आता राजकीय पक्षांनी आपली कार्यालये येथे का उभारली हे समजून घेऊ. समितीच्या बैठकीचा अजेंडा अभ्यासण्यासाठी, भाषणे तयार करण्यासाठी, अधिवेशनाला संबोधित करण्यासाठी निवडून आलेल्या प्रतिनिधींना बीएमसी इमारतीत स्वतंत्र कार्यालय नसते.
भाजपचे सचिव विनोद शेलार म्हणतात की, नगरसेवक हे सामान्य नागरिक आणि प्रशासन यांच्यात सेतू म्हणून काम करतात, त्यामुळे लोक विविध समस्यांसासाठी त्यांच्याशी संपर्क साधत असतात. त्यामुळे पक्षाच्या कामासाठी, विविध बैठकांसाठी, पक्षाचा अजेंडा आणि अध्ययनासाठी, विविधी प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी पक्षाच्या कार्यालयात येतात, हे पक्ष कार्यालय त्यांच्यासाठी कामाचे ठिकाण असते. ही कार्यालये केवळ सार्वजनिक सेवेसाठी वापरली जातात.
BMC कार्यालयाचे वाटप कशाच्या आधारावर करते?
येथे बीएमसी पक्षीय जागांच्या आधारे कार्यालयाचे वितरण केले जाते. उदा. बीएमसीमध्ये शिवसेनेच्या सर्वाधिक ९७ जागा आहेत. भाजप 80 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर काँग्रेसकडे 31, राष्ट्रवादीकडे 9 आणि सपाकडे 6 जागा आहेत.
त्यामुळे सर्वात मोठे कार्यालय शिवसेना आणि भाजपकडे आहे. नियमानुसार कार्यालये नागरी संस्थेच्या अंतर्गत येतात. प्रत्येक निवडणुकीनंतर निकालाच्या आधारे पक्षांना कार्यालयांचे वाटप केले जाते. 1970 च्या दशकात काँग्रेसचा विक्रम होता. काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष होता. त्यावेळी कॉंग्रेसचे सर्वात मोठे कार्यालय होते. 1997 पासून शिवसेना क्रमांक एकचा पक्ष म्हणून पुढे आला. त्याचवेळी 2017 पर्यंत भाजपकडे 30 जागा होत्या, मात्र 2017 नंतर झालेल्या निवडणुकीत चित्र बदलले. तसेच येत्या निवडणुकीत शिवसेनेला कमी पक्ष मिळाल्यास त्यांच्या कार्यालयाची व्याप्ती कमी होईल.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.