गृहराज्यमंत्र्यांकडून तासवडे टोलनाक्यावर कोकणवासियांचे स्वागत

यावेळी प्रवाशी, वाहधारकांसाठी तळबीड पोलिस व तासवडे टोलनाका व्यवस्थापनाच्यावतीने मोफत चहा व पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती, त्याचाही लाभ वाहनधारक, प्रवाशांनी घेतला. तसेच राज्य शासनाने मोफत टोल सुविधेसह वाहनधारकांसाठी केलेल्या विविध उपाययोजना बद्दल वाहनधारक, प्रवाशांनी राज्य शासनाचे आभार मानले.
Home Minister welcomes Konkan residents at Tasawade Tolnaka
Home Minister welcomes Konkan residents at Tasawade Tolnaka

वहागांव : गणेशोत्सवासाठी कोकणाकडे निघालेल्या मुंबईकर कोकणवासियांचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आज दुपारी तासवडे (ता. कऱ्हाड) येथील टोलनाक्यावर आस्थेवाईकपणे विचारपूस करीत स्वागत केले. Home Minister welcomes Konkan residents at Tasawade Tolnaka 

व्यवसाय व नोकरीनिमित्त मुंबई परिसरात वास्तव्यास असणारे बहुतांशी कोकणवासिय प्रतीवर्षी गणेशोत्सवासाठी मुंबईहून कोकणाकडे येत असतात. राज्य शासनाने प्रतीवर्षाप्रमाणे यावर्षीही या मुंबईकर कोकणवासियांसाठी टोल सवलतीसह विविध उपाययोजनांची सोय केली होती.

दरम्यान, आज दुपारी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी तासवडे (ता. कऱ्हाड) येथील टोलनाक्यावर मुंबईहून कोकणाकडे निघालेल्या कोकणवासियांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. श्री. देसाई यांनी वाहनधारक, प्रवाशांना त्यांच्या प्रवासातील सेवा-सुविधांची विचारपूस करीत माहिती घेतली आणि त्यांना गणेशोत्सावासाठी शुभेच्छा दिल्या.

मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, गणेशोत्सवासाठी कोकणाकडे निघालेल्या कोकणवासियांचा प्रवास सुखकर व्हावा, टोलनाक्यावर त्यांना कसलाही त्रास होऊ नये यासाठी राज्य शासनाने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संबंधितांसमवेत वेळोवेळी बैठका घेऊन योग्य नियोजन केले होते. आज सातारा जिल्ह्यातील आनेवाडी व तासवडे येथील टोलनाक्यावर त्याची पाहणी केली असता वाहनधारकांची चांगल्या पद्धतीची सोय झाली असल्याचे दिसून आले.

तसेच राज्यात अजूनही कोरोनाचे सावट असल्याने सर्व गणेशभक्तांनी प्रशासनाने घालून दिलेल्या नियम, अटींचे पालन करुन शांततेत हा गणेशोत्सव साजरा करावा. यावेळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरज पाटील, पोलिस उपअधीक्षक डॉ. रणजीत पाटील, तळबीड पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक जयश्री पाटील, तासवडे टोलचे व्यवस्थापक रमेश शर्मा, नरेंद्र लिबे यांच्यासह पोलिस कर्मचारी, वाहनधारक व टोल कर्मचारी उपस्थित होते.

दरम्यान, यावेळी प्रवाशी, वाहधारकांसाठी तळबीड पोलिस व तासवडे टोलनाका व्यवस्थापनाच्यावतीने मोफत चहा व पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती, त्याचाही लाभ वाहनधारक, प्रवाशांनी घेतला. तसेच राज्य शासनाने मोफत टोल सुविधेसह वाहनधारकांसाठी केलेल्या विविध उपाययोजना बद्दल वाहनधारक, प्रवाशांनी राज्य शासनाचे आभार मानले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com