राष्ट्रवादीवर आरोप करताच गृहमंत्र्यांनी वाढवली सदाभाऊंची सुरक्षा!

सदाभाऊ खोत यांची सुरक्षा वाढविण्याचे गृहमंत्र्यांचा पोलिस महासंचालकांना आदेश
राष्ट्रवादीवर आरोप करताच गृहमंत्र्यांनी वाढवली सदाभाऊंची सुरक्षा!
Sadabhau Khot-Dilip Walse PatilSarkarnama

मुंबई : माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांच्या जिवाला धोका आहे, असं मला तरी काही वाटत नाही. पण, तरीसुद्धा आज (ता. १८ जून) सकाळीच मी राज्याच्या पोलिस महासंचालकांना ‘सदाभाऊ खोत यांची सुरक्षा वाढविण्यात यावी,’ अशी सूचना दिली आहे, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी माध्यमाशी बोलताना दिली. (Home Minister orders DGP to increase security of Sadabhau Khot)

सांगोल्यातील हॉटेल चालकाने सदाभाऊ खोत यांना बिलासाठी अडवले होते. त्याच्या दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद घेत सदाभाऊ खोत यांनी यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचा एक नेता असल्याचा आरोप केला होता. तसेच, आपल्या जिवाला राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबीयांकडून धोका असल्याचेही त्यांनी म्हटले होते. त्यासंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर गृहमंत्री वळसे पाटील यांनी वरील उत्तर दिले.

Sadabhau Khot-Dilip Walse Patil
शिवसेना हाय अलर्टवर : मतदानात चूक अथवा दगाफटका केल्यास आमदारांवर कडक कारवाई

दिलीप वळसे पाटील म्हणाले की, माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या जिवाला धोका आहे, असं मला तरी काही वाटत नाही. पण तरीसुद्धा खोत यांनी जी भीती व्यक्त केली आहे, ती लक्षात घेऊन आणि त्यांचे जीवन सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीकोनातून मी आज सकाळीच राज्यच्या पोलिस महासंचालकांना ‘सदाभाऊ खोत यांची सुरक्षा वाढविण्यात यावी,’ अशी सूचना दिली आहे.

Sadabhau Khot-Dilip Walse Patil
दामाजी कारखाना निवडणूक : आमदार समाधान आवताडेंना काकाच देणार आव्हान?

ज्येष्ठ नेते शरद पवार यांना आम्ही नेहमीच भेटत असतो. त्यांच्या कानावर अनेक गोष्टी घालायच्या असतात. काही विषयांसदर्भात त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्यायचं असतं. त्याप्रमाणे आजची भेट नियोजित होती. त्यानुसार ती झाली आहे, असेही गृहमंत्र्यांनी या वेळी बोलताना स्पष्ट केले.

Sadabhau Khot-Dilip Walse Patil
'सदाभाऊ, तुमच्या उधारीची पावती, राष्ट्रवादीच्या नावावर का फाडता?'

एक कार अचानकपणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाहनांच्या ताफ्यात घुसण्याची घटना अनावधानाने घडली आहे. त्यात कोणताही वेगळा प्रकार नाही. त्या ठिकाणी जो बंदोबस्त पाहिजे होता, त्यामध्ये पोलिस यंत्रणा कुठे कमी राहिली आहे की याची माहिती घेण्यात येत आहे. जाणीवपूर्वक काही घडलं असावं, असं मला तरी वाटत नाही. त्या काही आढळलं तरच कारवाई करण्यात येईल, असे वळसे पाटील यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in