परमबीरसिंहांचा पाय खोलात! गृहमंत्र्यांनीच दिले कारवाईचे संकेत

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप करून मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह चांगलेच अडचणीत आले आहेत.
Dilip Walse Patil and Param Bir Singh
Dilip Walse Patil and Param Bir SinghSarkaranama

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर शंभर कोटींच्या वसुलीचा आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह (Param Bir Singh) तब्बल सहा महिन्यांनी मुंबई दाखल झाले आहेत. त्यांची काल गुन्हे शाखेच्या कार्यालयात चौकशी सात तासांहून अधिक काळ चौकशी झाली होती. आज ठाण्यात दाखल गुन्ह्यात त्यांची चौकशी सुरू आहे. दरम्यान, त्यांच्यावर कारवाई करण्याची तयारी राज्य सरकारने केली आहे.

परमबीरसिंह हे सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ गायब होते. अखेर ते 25 नोव्हेंबरला मुंबईत परतले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची तयारी राज्य सरकारने केली आहे. याला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही दुजोरा दिला आहे. ते म्हणाले की, पोलीस सेवा नियमावलीनुसार योग्य असलेली कारवाई परमबीरसिंह यांच्यावर केली जाईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर याबाबत अंतिम निर्णय घेतला जणार आहे.

बांधकाम व्यावसायिक केतन टन्ना यांनी परमबीरसिंह यांच्या विरोधात ठाणे पोलिसांकडे खंडणीची तक्रार दिली होती. या प्रकरणी जुलै महिन्यात गुन्हा दाखल झाला होता. परमबीरसिंह हे 2019-2019 मध्ये पोलीस आयुक्त होते. त्यांनी आणि इतर आरोपींनी टन्ना यांच्याकडून 1.25 कोटी रुपयांची खंडणी उकळली. तसेच, टन्ना यांचे मित्र सोनू जालान यांच्याकडूनही 3 कोटी रुपयांची खंडणी उकळली होती. या प्रकरणी परमबीरसिंह यांच्या विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंटही बजावण्यात आला आहे.

Dilip Walse Patil and Param Bir Singh
दिल्लीतून फोन येताच अमल महाडिकांची माघार अन् सतेज पाटील बिनविरोध

परमबीरसिंह हे या प्रकरणात चौकशीसाठी आज वकिलांना सोबत घेऊन ठाणेनगर पोलीस ठाण्यात आज सकाळी 10 वाजून 30 मिनिटांनी हजर झाले. आता ठाणे पोलिसांकडून त्यांची चौकशी सुरू आहे. ठाण्याच्या पोलीस आयुक्तांनी या तपासासाठी विशेष तपास पथक नेमले आहे. या पथकाचे नेतृत्व पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे करीत आहेत. विशेष म्हणजे मनसुख हिरेनचा खून उपायुक्त अंबुरे यांच्याच परिमंडळाच्या हद्दीत झाला होता.

Dilip Walse Patil and Param Bir Singh
परमबीरसिंहांना दणका! आरोप करून ऐनवेळी माघार घेणं पडलं महागात

सुरवातीचा तपास त्यामुळे अंबुरे यांच्याच नेतृत्वाखाली झाला. नंतर तो दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) आणि त्यानंतर राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) गेला. हिरेन खुन प्रकरणात बडतर्फ सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे हा मुख्य आरोपी आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानासमोर सोडलेली स्फोटके भरलेली एसयूव्ही हिरेन याचीच होती. नंतर ठाण्यातील खाडीत हिरेनचा मृतदेह आढळला होता. या प्रकरणी वाझेला अटक करण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com