Amit Shah : लालबागच्या राजाकडे अमित शहा काय मागणार ? ; सत्तातरानंतर पहिल्यांदाच 'वर्षां'वर येणार

Amit Shah : सत्तासंघर्षांनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा याचा हा पहिलाचं दौरा असल्याने हा दौरा राज्यातील राजकीय दृष्या महत्वाचा असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
Amit Shah
Amit Shah sarkarnama

मुंबई : भाजपचे नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) हे ५ सप्टेंबरला मुंबई (Mumbai) दौऱ्यावर येत आहेत.ते लालबागच्या राजाचं (Laubaug Cha Raja) दर्शन घेणार आहेत. (Amit Shah news update)

राज्यात ठाकरे-शिंदे यांच्यातील सत्तासंघर्षांनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा याचा हा पहिलाचं दौरा असल्याने हा दौरा राज्यातील राजकीय दृष्या महत्वाचा असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. गृहमंत्री अमित शहांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभुमीवर शहरात कडोकोट बंदोबस्त असणार आहे.

Amit Shah
Shiv Sena : अरविंद सावंत, भास्कर जाधवांना बढती, शिवसेनेच्या सचिवपदी पराग डाके

या दौऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवास स्थानी वर्षा बंगल्यावर जावून अमित शहा हे गणपती बाप्पांचं दर्शन घेणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) या नेत्यांच्या घरी जाऊन बाप्पाचं दर्शन घेणार असल्याचे नियोजन आहे.

Amit Shah
Pune Ganeshotsav : पुण्यातील 'ठाकरे-शिंदे सत्तासंघर्ष' पोलिसांनी रोखला..सांगितलं हे कारण..

सिध्दविनायकाचं देखील दर्शन शहा हे घेणार आहेत. यापूर्वीही अमित शहा यांनी लालबागच्या राज्याचं दर्शन घेतलं आहे. नवसाला पावणारा बाप्पा अशी ख्याती असलेल्या लालबागच्या राजाकडे अमित शहा काय मागणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर शहांच्या या दौऱ्याला विशेष महत्व आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in