Amit Shah : भर कार्यक्रमात अमित शहांनी हरियाणाच्या मंत्र्याला फटकारलं ; व्हिडिओ व्हायरल

Amit Shah : तुम्हाला 5 मिनिटे दिली होती. त्यानंतरही तुम्ही साडेआठ मिनिटे भाषण केले. आता तुमचे भाषण थांबवा.
Amit Shah, Anil Vij
Amit Shah, Anil Vijsarkarnama

Amit Shah : हरियाणाच्या गृहमंत्र्यांना आपलं लांबलेलं भाषण अडचणीत ठरलं, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अनेकवेळा सूचना देऊनही ते थांबले नसल्याने शहा त्यांच्यावर चांगलेत संतापले. या कार्यक्रमांचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे.

हरियाणाच्या सूरजकुंड येथे केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वतीने एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला अमित शहा उपस्थित होते.यावेळी हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज यांनी स्वागतपर भाषण केले. मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांचे मुख्य भाषण होणार होते. कार्यक्रमाचा समारोप अमित शहा यांच्या भाषणाने होणार होता.

स्वागतपर भाषण करताना विज यांचे भाषण लांबत होते, तेव्हा त्यांना अमित शहा यांनी अनेकवेळा भाषण संपविण्याच्या सूचना दिल्या, पण शहांच्या या सूचनाकडे विज यांनी दुर्लक्ष करीत आपलं भाषणं सुरुच ठेवलं. अखेर शहा यांनी त्यांना 'भाषण संपवा, असे चालणार नाही,' अशा स्पष्ट शब्दांत सुनावत माईक आपल्या हाती घेतला.

Amit Shah, Anil Vij
Aaditya Thackeray : चार प्रकल्प महाराष्ट्रातून गेले, आता तरी उदय सामंत राजीनामा देणार का ?

शहांनी विज यांचा माईक हातात घेत त्यांना थांबण्याची सूचना केली, तरीही विज यांनी शहा यांच्याकडून वेळ मागून आपले भाषणं सुरुच ठेवलं.

अमित शहा म्हणाले, "तुम्हाला 5 मिनिटे दिली होती. त्यानंतरही तुम्ही साडेआठ मिनिटे भाषण केले. आता तुमचे भाषण थांबवा.ही मोठी भाषणं करण्याची जागा नाही. थोडक्यात संपवा. अनिलजी, माफ करा. पण हे असं चालणार नाही. संपवा, असे सांगून त्यांनी आयोजकांना पुढील कार्यक्रम सुरू करण्याची सूचना केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in