HMV : रोहित पवारांचे फडणवीसांना प्रत्युत्तर : सांगितलं 'एचएमव्ही'चा फुलफॉर्म!

HMV : काही 'एचएमव्ही' पत्रकार फेक नेरेटिव्ह तयार करत असल्याचा फडणवीसांचा आरोप!
Devendra Fadnavis, Rohit Pawar
Devendra Fadnavis, Rohit PawarSarkkarnama

मुंबई : महाराष्ट्रातून राज्यातून उद्योग गुजरातला निघून जात आहेत, शिंदे-फडणवीस सरकार गुजरात राज्याचे एजंट म्हणून काम करत आहे, असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन सर्व आरोपांना फेटाळून लावले होते. यावेळी फडणवीसांनी काही पत्रकारांबाबत 'एचएमव्ही' असा शब्द वापरला होता. यावर आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी आक्षेप घेतला आहे.

आमचं सरकार स्थापन होऊन केवळ तीनच महिने झाले. तरीही राज्यातून उद्योग बाहेर चाललेत, असा आरोप आमच्यावर केला जातो. फेक नेरेटिव्ह तयार केला जात आहे. काही राजकीय पक्ष, त्यांची इको सिस्टीम, काही 'एचएमव्ही' पत्रकार हे महाराष्ट्राची जाणीवपूर्वक बदनामी करत आहेत, असं फडणवीसांनी म्हंटले होते. यावरच ट्विट करत रोहित पवार यांनी आक्षेप घेतला.

Devendra Fadnavis, Rohit Pawar
बच्चू कडूंचे कार्यकर्ते आक्रमक; रवी राणांच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्तात वाढ

रोहित पवार म्हणाले, ठाम महाराष्ट्राची बाजू मांडणारा मग तो पत्रकार असो, युवा असो, किंवा सामान्य नागरिक असो, हे सर्वचजण नक्कीच 'एचएमव्ही' म्हणजे 'ही इज महाराष्ट्र व्हाईस' (He is Maharashtra's Voice) आहेत. राजकीय नेते गप्प बसले तरी खरे 'एचएमव्ही' मात्र महाराष्ट्राची भूमिका मांडताना कधीही गप्प बसणार नाहीत.असा आशयाचं ट्विट रोहित पवार यांनी केले आहे.

Devendra Fadnavis, Rohit Pawar
Bharat Jodo Yatra : राहुल गांधी चढले बसच्या टपावर, व्हिडीओ तूफान व्हायरल!

कितीही प्रयत्न केले तरी सामान्यांचा आवाज दाबता येत नाही. आजची राजकीय परिस्थिती बघता महाराष्ट्राच्या हितासाठी आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी आपल्या प्रत्येकालाच आवाज उठवावा लागणार आहे आणि 'एचएमव्ही' म्हणजेच 'ही इज महाराष्ट्र व्हाईस' व्हावं लागणार आहे, असंही रोहित पवार म्हणालेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com