राज ठाकरेंवर कारवाई होणार? वळसे पाटलांनी दाखवलं पोलीस आयुक्तांकडं बोट

औरंगाबादचे पोलीस आयुक्त त्याचा अभ्यास करत आहेत. कायदेशीर मत घेऊन निर्णय घेतला जाईल, असे वळसे पाटील यांनी सांगितले.
Dilip Walse Patil and Raj Thackeray
Dilip Walse Patil and Raj ThackeraySarkarnama

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी रविवारी औरंगाबादमध्ये घेतलेल्या सभेत भोंग्याबाबत पुन्हा एकदा निर्वाणीचा इशारा दिला आहे. पण आता त्यावरून त्यांच्यावर राज्याच्या गृह विभागाकडून कारवाई केली जाणार की नाही, याबाबत उलटसुलट चर्चा आहेत. पोलिसांनी घालून दिलेल्या अटींचे उल्लंघन झाल्याचे सांगितले जात आहे. त्यावर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

पुण्यात एका वृत्तवाहिनीशी बोलताना वळसे पाटील यांनी राज ठाकरे हे सर्वोच्च न्यायालयापेक्षा (Supreme Court) मोठे नाहीत, असा टोला लगावला. ते म्हणाले, त्यांच्या भाषणात काहीही वेगळं नव्हतं. केवळ भोंगे आणि पवारसाहेबांवर टीका होती. समाजासमाजात तेढ कशी निर्माण होईल, अशी प्रक्षोभक वक्तव्य पाहायला मिळाली. उद्या मुंबईला सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. अनुचित घटना घडू नये, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. औरंगाबादचे पोलीस आयुक्त त्याचा अभ्यास करत आहेत. कायदेशीर मत घेऊन निर्णय घेतला जाईल, असं वळसे पाटील यांनी स्पष्ट केलं.

Dilip Walse Patil and Raj Thackeray
राज ठाकरेंच्या सभेनंतर पोलीस अॅक्शन मोडवर; प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांची होणार धरपकड?

कायदा व सुव्यवस्थेचे उल्लंघन कुणीही करून चालणार नाही. त्यासाठी पोलीस दल सक्षम आहे. देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. रात्री दहा ते सकाळी सहा या वेळा सोडून इतरवेळी भोंगे पोलिसांच्या परवानगीने लावावे. राज ठाकरे हे सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठे नाहीत. मुस्लिम समाजाला समोर ठेवून त्यांनी जर काही भूमिका घेतली असेल तर त्याचा परिणाम केवळ मुस्लिम समाजावर होणार नाही. कीर्तने रात्री उशिरापर्यंत चालतात, काकड आरती पहाटे चार वाजता असते. जागरण-गोंधळ, गावागावत होणार तमाशे, भजन, कीर्तन, वारकरी संप्रदायावर त्याचा परिणाम होणार आहे, असं वळसे पाटील म्हणाले.

कुणालाही अधिकचे अधिकार दिलेले नाहीत. आपण सगळ्यांनी शांततेत घ्यावे. परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहोत. उद्या याबाबत बैठक आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशीही चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असं सांगत वळसे पाटील यांन जनतेला आश्वस्त केलं. तसेच पोलीसांकडून तयारी केली जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता मंगळवारी होणाऱ्या बैठकीत पोलीस काय निर्णय घेणार, राज ठाकरे यांच्यावर कारवाई होणार का, याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

Dilip Walse Patil and Raj Thackeray
प्रशांत किशोर करणार धमाका; 'सुरूवात बिहारपासून' असं म्हणत दिले मोठे संकेत

दरम्यान, औरंगाबादमध्ये रविवारी केलेल्या भाषणात त्यांनी चार तारखेला देशभरात मशिदींसमोर हनुमान चालीसा पठण करण्याचे आवाहन ठाकरे यांनी केलं आहे. त्यानंतर आता कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अॅक्शन मोडवर आले आहेत. राज ठाकरे यांच्या सभेनंतर पोलीस सतर्क झाले असून चार तारखेला कोणतीही अनुचित घटना टाळण्यासाठी मनसेचे आक्रमक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना नोटिसा बजावण्यास सुरूवात झाली आहे. त्यांना कलम 149 अंतर्गत नोटीसा दिल्या जात असल्याचे माहिती समोर आली आहे. बेकादेशीरपणे जमाव जमवून कायदा-सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाऊ शकते. आज गृह विभागाकडून तातडीने बैठक घेतली जाण्याची शक्यता आहे. त्यामध्ये चार तारखेबाबत महत्वाचे निर्णय घेतले जाऊ शकतात.

सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांचा दाखला काहीजण सध्या देत आहेत. पण (तेवढ्यात बांग सुरू होते) सभेच्या वेळी हे बांग देणार असतील, त्यांना बंद करायला सांगावे. हे सांगून ऐकणार नसतील, तर त्यानंतर महाराष्ट्रात काय होईल, ते मला माहिती नाही. ते सरळ सांगून ऐकत नसतील, तर एकदा होऊन जाऊद्याच. सगळ्या धार्मिक स्थळावरील भोंगे उतरवले पाहिजेत. पण, अगोदर मशिदीवरील भोंग उतरवा आणि मगच मंदिरावरील भोंगे काढा, त्यामुळे ‘अभी नही; तो कभी नाही,’ अशी भूमिकाही राज ठाकरे यांनी यावेळी मांडली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com