आम्हाला आश्वासन कळतात; कोणाला मतदान केले यांचे हितेंद्र ठाकूरांनी दिले संकेत!

बहुजन विकास आघाडीच्या 3 आमदारांच्या मतासाठी शिवसेना आणि भाजपमध्ये (BJP) रस्सीखेच सुरु होती.
आम्हाला आश्वासन कळतात; कोणाला मतदान केले यांचे हितेंद्र ठाकूरांनी दिले संकेत!
HItendra Thakur Sarkarnama

मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीसाठी (Rajya Sabha Election) आमदारांचे मतदान पूर्ण झाले आहे. मात्र, या संपूर्ण मतदान प्रक्रियेमध्ये विशेष लक्ष वेधून घेतले ते बहुजन विकास आघाडीच्या उमेदवारांनी. बविआचे आमदार मतदान करण्यासाठी आल्यानंतर त्यांना नेण्यासाठी शिवसेनेच्या (Shivsena) वतीने खुद्द सचिव मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) आले होते. तर भाजपच्या वतीने प्रसाद लाड आले होते. बहुजन विकास आघाडीच्या 3 सदस्यांनी मतदानाला शेवटचे १० मिनिटे बाकी असताना मतदान केले. (Rajyasabha Election 2022 News Updates in Marathi)

सुरुवातीपासून बहुजन विकास आघाडीच्या 3 आमदारांच्या मतासाठी शिवसेना आणि भाजपमध्ये (BJP) रस्सीखेच सुरु होती. भाजपच्या वतीने राज्यसभेचे उमेदवार धनंजय महाडिक आणि माजी मंत्री गिशिष महाजन यांनी हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली होती. तर महाविकास आघाडीच्या वतीने स्वत: शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोन केला होता.

HItendra Thakur
शिवसेनेच्या दुसऱ्या संजयला माझ्यापेक्षा एक मत जास्त मिळेल! राऊतांना आत्मविश्वास

मतदान केल्यानंतर माध्यामांशी बोलताना हितेंद्र ठाकूर (Hitendra Thakur) म्हणाले, आमचा उमेदवार जो आहे त्याला मत दिले. कोणाला दिले हे कुठे सांगत असतात. आमच्या मतदारसंघात कामे करण्यासाठी जो आमची कायमस्वरूपी मदत करेल त्यालाच मतदान केले. प्रत्येक आमदाराची इच्छा आहे. दर तीन महिन्यांनी राज्यसभा, विधानपरिषद निवडणूक होत राहते, असे ते म्हणाले.

HItendra Thakur
'बविआ'ची मते कुणाला...नार्वेकर अन् लाड स्वागताला गेले पण ठाकूरांनी कुणाचं ऐकलं?

दरन्यान, शिवसेनेच्या नेत्यांनी ठाकूर यांची भेट घेतली होती. दरम्यान, शिवसेनेचे उमेदवार संजय पवार (Sanjay Pawar) यांना कॉंग्रेसची ४ मते, राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP) ९ आणि राष्ट्रवादी समर्थक अपक्षांची तीन मते शिवसेनेचीही १३ मते त्यांना मिळाली आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीच्या घटक पक्षांची पहिल्या पसंती क्रमांकाची २६ मते संजय पवार यांना मिळाल्याचा दावा आघाडीच्या नेत्यांनी केला आहे. त्याच बरोबर संजय पवार यांना आघाडीतील इतर घटक पक्ष आणि अपक्ष आमदारांची ही मते मिळाल्याचे सांगितले जात आहे. पहिल्या पसंतीची ४१ मते त्यांना मिळतील असा दावा, शिवसेनेच्या वतीने करण्यात आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in