आमदार हितेंद्र ठाकूर यांना धक्का, खंदे सहकारी शिवसेनेत दाखल!

वसई-विरार महापालिका आमदार हितेंद्र ठाकुर आणि बहुजन विकास आघाडीचा बालेकिल्ला समजली जाती
Sudesh Choudhari In shivsena
Sudesh Choudhari In shivsenaSarkarnama

वसई : राज्यातील महानगरपालिका, नगरपालिकांच्या निवडणूका जशा जवळ येवू लागल्या आहेत तशी बरीच राजकीय समीकरण बदलू लागली आहेत. प्रत्येक नेत्यांनी त्यासाठी आपल्या आपल्या बालेकिल्ल्यांमध्ये सत्ता राखण्यासाठी तयारीला सुरुवात केली आहे. तर ज्यांची ताकद नाही अशा पक्षांनी आपली ताकद वाढवण्यासाठी आणि सत्ता काबिज करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. काहीसे असेच प्रयत्न शिवसेनेने वसई-विरार महानगरपालिकेमध्ये सुरु केले आहेत.

Sudesh Choudhari In shivsena
दोन बड्या मंत्र्यांवर हितेंद्र ठाकूर पडले भारी; ठाणे जिल्हा बँकेवर पालघरचेच वर्चस्व

वसई-विरार महापालिका आमदार हितेंद्र ठाकुर आणि बहुजन विकास आघाडीचा बालेकिल्ला समजली जाते. त्यामुळे आतापर्यंत इथे अन्य पक्षांची डाळ शिजू शकली नव्हती. पण बहुजन विकास आघाडीचे हे वर्चस्व मोडीत काढण्यासाठी शिवसेनेने जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. शिवसेनेने सध्या 'बविआ'मधील नाराजांवर आपले लक्ष केंद्रित केले आहे. यातुनच शिवसेनेला पहिल्यांदा युवा नेते पंकज देशमुख यांनी साथ दिली होती.

त्यानंतर आता हितेंद्र ठाकूर यांच्या जवळचे आणि माजी स्थायी समिती सभापती सुदेश चौधरी यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवबंधन बांधत चौधरी यांनी सेनेत प्रवेश केला आहे. सुदेश चौधरी यांच्यासोबत माजी नगरसेवक किशोर नाना पाटील यांनीही हाती शिवबंधन बांधत 'बविआ' धक्का दिला आहे. या दोघांबरोबरच नगरसेविका पुतुल झा या देखील शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे समजते आहे.

Sudesh Choudhari In shivsena
नारायण राणेंनी घेतली हितेंद्र ठाकूरांची भेट; महाआघाडीला सूचक इशारा

वसई विरार महानगरपालिकेची रखडलेली निवडणूक डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. त्यासाठी प्रभागरचना करण्याचे काम सुरु झाले आहे. यातच बहुजन विकास आघाडीवर नाराज असलेल्या नेत्यांकडे शिवसेनेने आपला मोर्चा वळविला आहे. महापालिकेच्या स्थापनेपासून शिवसेनेला पालिकेत दोन अंकी आकडा कधीच गाठता आलेला नाही. दुसऱ्या बाजूला बहुजन विकास आघाडीने पालिकेवर आतापर्यंत एकहाती सत्ता राखली आहे. गेल्यावेळी तर ११५ पैकी १०८ नगरसेवक निवडून आणून बहुजन विकास आघाडीने इतिहास रचला होता.

पण आता या दोन्ही पक्षप्रवेशांमुळे वसई विरार महापालिकेवर गेली दहा वर्षे सत्ता गाजविणाऱ्या बविला पहिल्यांदाच धक्का बसला असल्याचे बोलले जात आहे. मात्र आता सुदेश चौधरी यांना संघटनेत जिल्हाप्रमुख किंवा अन्य कोणते मोठे पद मिळणार का? हा प्रश्न अद्याप गुलदस्त्यात आहे. सुदेश चौधरी यांच्या पक्ष प्रवेशावेळी सेनेचे पालघर जिल्हा संपर्कप्रमुख आणि आमदार रवींद्र फाटक, जिल्हा प्रमुख वसंत चव्हाण, तालुका प्रमख निलेश तेंडुलकर, पंकज देशमुख आणि इतर नेते उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in