मायक्रो फायनान्स कंपन्यांना दणका : अवैध वसुलीवर कारवाईचे गृहराज्यमंत्र्यांचे आदेश...

मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या finance Company चुकीच्या कार्यपद्धतीला वेळीच आळा घातला जावा should be curbed, हाच यामागचा हेतू आहे, असेही मंत्री शंभूराज देसाई Shambhuraj Desai यांनी स्पष्ट केले.
Shambhuraj Desai Meeting
Shambhuraj Desai Meetingsarkarnama

मुंबई : अवैध पद्धतीने कर्जवसुली करणाऱ्या मायक्रो फायनान्स कंपन्यांवर पोलिस प्रशासनाने कारवाई करावी. तसेच कर्जदारांच्या तक्रारींची गंभीर दखल घ्यावी, असे निर्देश गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी पोलिस अधिकाऱ्यांना दिले आहेत. सनदशीर मार्गाने कर्जवसुली न करता ज्या कंपन्या अन्यायकारक वागणूक देत आहेत, अशा कंपन्यांविरोधात कर्जदारांनी पोलिसात तक्रार द्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कोल्हापूर जिल्ह्यातील मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून अवैध पद्धतीने कर्जवसुली होत असल्याबद्दल यासंदर्भात मंत्रालयात गृहराज्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली अधिकऱ्यांची बैठक झाली. यावेळी आमदार प्रकाश आबिटकर, आमदार नरेंद्र दराडे यांच्यासह गृह विभागाचे प्रधान सचिव संजय सक्सेना, सहपोलिस आयुक्त मिलिंद भारंबे, कोल्हापूरचे पोलिस अधिक्षक शैलेश बलकवडे, तसेच व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया, पुण्याचे सहपोलिस आयुक्त संदीप कर्णिक आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Shambhuraj Desai Meeting
सोमय्यांच्या टीकेवर गृहराज्यमंत्री म्हणाले, कितीही त्रास दिला तरी शिवसेना डगमगणार नाही...

कोल्हापूर जिल्ह्यातील मायक्रो फायनान्स कंपन्या अवैध पद्धतीने कर्ज वसुली करत असल्याचे निदर्शनास आले आहे. या कंपन्यांच्या प्रतिनिधींकडून असभ्य भाषेचा वापर करणे, कर्जदारांना रस्त्यात अडवणे, घरात घुसणे अशा प्रकारचे वर्तन होत असल्याच्या तक्रारी येत आहेत, अशी माहिती आमदार प्रकाश आबिटकर, आमदार नरेंद्र दराडे यांनी बैठकीत दिली.

Shambhuraj Desai Meeting
संभाजीराजेंशी राऊत, देसाई, घडाघडा बोललेच नाहीत, नार्वेकरांनी विषयच संपविला!

यावर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, अवैध पद्धतीने कर्जवसुली करणाऱ्या मायक्रो फायनान्स कंपन्यांवर पोलिस प्रशासनाने कारवाई करावी. कर्जदारांच्या तक्रारींची गंभीर दखल घ्यावी. कर्जदार नागरिकांनाही माझे आवाहन आहे की, सनदशीर मार्गाने कर्जवसुली न करता ज्या कंपन्या अन्यायकारक वागणूक देत आहेत, अशा कंपन्यांविरोधात कर्जदारांनी पोलीसात तक्रार द्यावी.

Shambhuraj Desai Meeting
उत्कृष्ट जिल्हा कौशल्य विकास आराखडा पुरस्कार सातारा जिल्ह्याला जाहीर

मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या अवैध कर्जवसुलीबाबतच्या तक्रारींचा अहवाल पोलिस अधीक्षकांनी सादर करावा, अशी सूचनाही यावेळी केली. हा अहवाल केंद्र सरकारला पाठवला जाईल. कंपन्यांच्या चुकीच्या कार्यपद्धतीला वेळीच आळा घातला जावा, हाच यामागचा हेतू आहे, असेही मंत्री देसाई यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com