मंत्रालय हादरले : मंत्र्याला सांगुनही बिल नाही, ठेकेदाराचा कुटुंबासह आत्महत्येचा प्रयत्न

Ashok Chavan | धर्मा पाटील आत्महत्या प्रकरणाची पुन्हा एकदा चर्चा
suicide attempt
suicide attempt Sarkarnama

मुंबई : सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्याकडे मदत मागूनही काम न झाल्याने हिंगोली जिल्ह्यातील एका ठेकेदार कुटुंबाने मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. अंगावर रॉकेल टाकून या कुटुंबियांने आत्मदहनाचा प्रयत्न केला. यामुळे मंत्रालय परिसरात एकच खळबळ उडाली. मात्र पोलिसांनी वेळीच मध्यस्थी करत कुटुंबियांना अडवल्याने पुढील अनर्थ टळला आहे.

राजू चन्नापा हुनगुंडे (रा. माळवटा, ता. वसमत, जि. हिंगोली) असे आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या कुटुंब प्रमुखाचे नाव असून, ते रस्ते बांधणीचा ठेका घेवून तो बांधण्याचे (Road Contractor) कामे करतात. आज आत्मदहनापासून रोखल्यानंतर त्यांनी सरकारवर गंभीर आरोप केले. यावेळी हनगुंडे म्हणाले की, आपण काही दिवसांपूर्वी नांदेड जिल्ह्यातील पालम रोड ते धानोरा काळे येथे जवळपास साडे आठ किलोमीटरच्या रस्त्याचे काम केले. याचे एकूण बिल १ कोटी ७० लाख रुपये झाले. मात्र त्यापैकी आपल्याला केवळ १४ लाख रुपये देण्यात आले.

suicide attempt
संभाजीराजेंची राजकीय दिशा ठरली! निवडणूक आणि पक्षाविषयी दोन मोठ्या घोषणा

यानंतर कामाचे उर्वरित पैसे मागितले म्हणून मला आणि माझ्या कुटुंबाला जबर मारहाण करण्यात असा गंभीर आरोप यावेळी हुनगुंडे यांनी केला. यावेळी त्यांनी आपण सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनाही मदत मागितली, त्यांची भेट देखील घेतली होती. पण तरी देखील काम झाले नाही. त्यामुळे अखेर कुटुंबासह आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला असे खुलासा त्यांनी केला.

हुनगुंडे यांच्या या आत्महत्येच्या प्रयत्नानंतर मंत्रालय परिसरात पुन्हा एकदा धर्मा पाटील यांच्या आत्महत्या प्रकरणाची आठवण झाली. धुळे जिल्ह्यातील विखरण (ता. शिंदखेडा) येथील ८० वर्षीय शेतकरी धर्मा पाटील यांनी काही दिवसांपूर्वी मंत्रालयात विष प्राशन करून आत्महत्या केली होती. त्यांच्या जमिनीचा योग्य मोबदला मिळाला नसल्याचा आरोप करत त्यांनी २२ जानेवारी २०१८ रोजी आत्महत्या केली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com