हिंदुत्व हिताचं उसणं अवसान आणू नका- हिंदू महासंघाने भाजपलाच फटकारलं

the kashmir files काश्मीरी पंडितांवर अन्याय ही भाजपची चूक आहे.
हिंदुत्व हिताचं उसणं अवसान आणू नका- हिंदू महासंघाने भाजपलाच फटकारलं

मुंबई : द काश्मीर फाइल्स (the kashmir files) रिलीज झाल्यानंतर देशभरात केवळ या सिनेमाचीच सर्वाधिक चर्चा होत आहे. यापूर्वी हा चित्रपट हरियाणा, गुजरात आणि कर्नाटकसह अनेक राज्यांमध्ये हा चित्रपट करमुक्त करण्यात आला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विवेक अग्निहोत्री यांनी केले असून चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाईही केली आहे. एकीकडे भाजपसह काही राजकीय पक्ष या सिनेमाचं समर्थन करत आहेत. तर काही राजकीय पक्षांनी याला विरोधही दर्शवला आहे. भाजपने या सिनेमाला पाठिंबा दर्शवलाय.

हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे (Anand Dave) यांनी द कश्मीर फाईल्स वरुन सुरु असलेल्या राजकारणावरुन थेट भाजपलाच फटकारलं आहे. विधीमंडळ अधिवेशनात सोमवारी (१४ मार्च) भाजप आमदार प्रवीण दटके (Pravin Datake) यांनी “‘द काश्मीर फाईल्स’सिनेमा महाराष्ट्रात करमुक्त करण्याची मागणी केली.

हिंदुत्व हिताचं उसणं अवसान आणू नका- हिंदू महासंघाने भाजपलाच फटकारलं
हिजाबवर बंदी योग्यच- कर्नाटक उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

यावर “अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असतानाच्या 5 वर्षांच्या काळात आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या 7 वर्षांच्या कार्यकाळात काश्मीरी पंडितांसाठी काय केलं? असा सवाल करत द काश्मीर फाईल्स सिनेमाबाबत भाजपने अवाक्षर काढू नये, अशा सडेतोड शब्दांत भाजपलाच फटकारलं आहे.

भाजपवाल्यांनो, खोटं-खोटं रडून हिंदुत्व हिताचं उसणं अवसान आणू नका. ‘द काश्मीर फाईल्स’चं सिनेमाच तुम्ही स्वागत करत असालात तरी ही घटना घडली तेव्हा केंद्रात भाजपचचं सरकार होतं, विश्वनाथ प्रताप सिंह (V.P. singh) भाजपच्याच पाठिंबावर पंतप्रधान होते. दहशतवाद्यानांही सोडून दिलं. ज्या राज्यपालांच्या देखरेखीखाली हे हत्याकांड ते जगनमोहन त्यावेळी तुमच्याच पाठिंब्यावर राज्यपाल होते. हे आम्ही अजून विरसलो नाही. तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या 5 वर्षांच्या काळात आणि नरेंद्र मोदी यांच्या 7 वर्षांच्या काळात भाजपने काश्मीरी पंडितांसाठी काय केलं? काश्मीरी पंडितांवर अन्याय ही भाजपची चूक आहे,' अशी खंतही आनंद दवे यांनी व्यक्त केली.

तर दुसरीकडे अॅड. असिम सरोदे यांनी यांनी या चित्रपटाबाबत फेसबुक पोस्टद्वारे भाष्य केलं आहे. “काश्मीर फाईल्स ही असत्यालाप करणारी आणखी एक फिल्म आहे. असत्याला सत्याचे कपडे घालण्याचे प्रकार वाढले आहेत”, असं असिम सरोदे यांनी म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com