Himant Sarma : महाराष्ट्राच्या राजकारणात आसामच्या मुख्यमंत्र्यांची एन्ट्री ;..ठाकरेंनी देवाचे राजकारण केले..

Himant Sarma on shiv sena : महाराष्ट्रातील विरोधी पक्षांनी भगवान शंकराच्या नावाने राजकारण करणे बंद करा
 Himant Sarma  , uddhav thackeray
Himant Sarma , uddhav thackeraySarkarnama

Himant Sarma on shiv sena symbol issue uddhav thackeray : शिवसेनेत सध्या सुरु असलेल्या घडामोडींवर आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी उडी घेतली आहे, त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. गुवाहाटीतील पमोहीच्या 'भीमाशंकर धाम ज्योतिर्लिंग मंदिरा'च्या यात्रेत ते माध्यमांशी बोलत होते.

पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर ज्योतिर्लिंगावर आसाम सरकारने प्रश्न उपस्थित केला आहे.भीमाशंकरचं सहावं ज्योतिर्लिंग हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात नसून आसाममध्ये असल्याचा दावा आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा (himant sarma)यांनी नुकताच केला. आसाम पर्यटन विभागानं यासंदर्भात जाहिरातबाजी देखील केली आहे.

हिमंत बिस्वा सरमा म्हणाले, "उद्धव ठाकरेंनी देवाचे राजकारण केले. त्यामुळे त्यांच्यावर शिवसेनेचे नाव व धनुष्यबाण गमावण्याची वेळ आली,"

 Himant Sarma  , uddhav thackeray
Shiv Sena : 'शिवसेनाभवन' ठाकरेंचे कि शिवाई ट्रस्टचे ? ; मनसेकडून कागदपत्र व्हायरल , वाचा सविस्तर..

'महादेवांचे हिमालयात वास्तव्य आहे. त्यांना कोणत्याही एका विशिष्ट स्थानापुरते मर्यादित करणे योग्य नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील विरोधी पक्षांनी भगवान शंकराच्या नावाने राजकारण करणे बंद करावे. यामुळेच शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटावर शिवसेना पक्षनाव व धनुष्यबाण हे पक्षचिन्ह गमावण्याची वेळ आली आहे,'अशा शब्दात सरमा यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

आसाम आणि महाराष्ट्र सरकारमध्ये भीमाशंकरवरुन वाद सुरु असताना सरमा यांनी केलेल्या या टीकेची चर्चा रंगली आहे. मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी भीमाशंकर आसाममध्ये असल्याचा दावा केला आहे. तर शिवसेनेने त्यांचा हा दावा फेटाळला आहे.

शिवसेना पक्ष, धनुष्य़बाण चिन्ह गेल्यानंतरही ठाकरे गटाचे विधीमंडळातील कार्यालय कुणाला मिळणार,याबाबत दोन दिवसापासून चर्चा सुरु होत्या. या चर्चांना आता पुर्णविराम मिळाला आहे. शिवसेनेच्या आमदारांनी (शिंदे गट) ठाकरे गटाचे विधीमंडळातील कार्यालय ताब्यात घेतले आहे. आज शिंदे गटातील आमदारांनी या कार्यालयात प्रवेश केला.

"विधीमंडळातील शिवसेना कार्यालयाचा ताबा शिंदे गटाने घेतला आहे, केंद्रीय निवडणूक आयोगाने योग्य निकाल दिला आहे. नियमात बसणारा सर्व गोष्टी आम्ही करु," असे आमदार भरत गोगावले यांनी कार्यालयात प्रवेश केल्यानंतर माध्यमांना सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in