राणा दाम्पत्याच्या घराबाहेर हायव्होल्टेज ड्रामा; संतप्त शिवसैनिकांनी बॅरिकेट्स तोडले

navneet rana| ravi rana| mumbai| नवनीत राणा आणि रवी राणा आज सकाळी नऊ वाजता मातोश्री समोर येणार होते
राणा दाम्पत्याच्या घराबाहेर हायव्होल्टेज ड्रामा;  संतप्त शिवसैनिकांनी बॅरिकेट्स तोडले
navneet rana| ravi rana|

मुंबई : राज्यात हिंदुत्व आणि हनुमान चालिसा या मुद्द्यांवरुन वातावरण तापले आहे. अशातच खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांचं निवासस्थान असलेल्या 'मातोश्री'समोर हनुमान चालिसा पठण करणार असल्याचं म्हटलं होतं. पण कालच्या गोंधळानंतर आजही या मुद्द्यावरुन हाय व्होलटेज ड्रामा सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. आज सकाळी सकाळीच राणा दाम्पत्याच्या मुंबईतील खार येथील घराबाहेर हजारोच्या संख्येने जमा झाले आहेत. शिवसैनिक (Shivsena) आक्रमक झाले असून राणा यांच्या घराबाहेरील बॅरिकेट्सही त्यांनी तोडल्याची माहिती समोर आली आहे.

नवनीत राणा आणि रवी राणा आज सकाळी नऊ वाजता मातोश्री समोर येणार आहेत. त्यामुळे कालपासूनच मातोश्रीवर शिवसैनिकांनी गर्दी केली आहे. नवनीत राणांनी डीवचल्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले आहेत.तर दुसरीकडे, कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून राणा दाम्पत्यांनी या ठिकाणी येऊ नये, अशा सूचना मुंबई पोलिसांनी दिल्या आहे. तर राणा दाम्पत्य आपल्या भूमिकेवर ठाम असल्यामुळे कालचा गोंधळ पाहता आज काय घडणार याकडे सर्व राज्याचे लक्ष लागले आहे.

navneet rana| ravi rana|
मंत्री गडाखांच्या स्वीय सहाय्यकावर बेछूट गोळीबार

मात्र कितीही विरोध झाला तरी आज मातोश्रीवर हनुमान चालिसा पठण करण्यासाठी जाणारच, अशी ठाम भूमिका आमदार रवी राणा यांनी घेतली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानासमोर हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा दिलेल्या दाम्पत्यानं अमरावती पोलिसांना गुंगारा देत मुंबई गाठली. त्यानंतर मुंबई पोलिसांनी राणा दाम्पत्याला प्रतिबंधात्मक नोटीस बजावली. पोलिसांनी नोटीस बजावल्यानंतर रवी राणा आणि नवनीत राणा यांनी मातोश्रीवर जाण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी रवी राणा यांनी शिवसेनेवर टीका केली.

मोहित कंबोज यांच्या गाडीवर हल्ला

भारतीय जनता पक्षाचे (Bjp) नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांच्या गाडीवर आज (ता. २२ एप्रिल) रात्री सव्वा नऊच्या सुमारास शिवसैनिकांनी हल्ला केला. या कंबोज यांच्या गाडीचे नुकसान झाले आहे. मात्र, कुणालाही दुखापत झालेली नाही. दरम्यान, कंबोज हे मातोश्रीची (Matoshri) रेकी करण्यासाठी आले होते, असा आरोप शिवसैनिकांनी केला

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.