
Gauri Bhide Allegation on Uddhav Thackeray: शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आणि त्यांच्या कुटुंबियांच्या बेहिशेबी मालमत्तेच्या चौकशीची मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. गौरी भिडे यांनी ही याचिका दाखल केली होती. याचिका फेटाळताना न्यायालयाने भिडे यांना 25 हजारांचा दंड ठोठावला आहे.
सुमारे सहा महिन्यांपूर्वी यांनी भिडे यांनी उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली होती. यावर न्यायालयाने मंगळवारी हा निकाल दिला.या संदर्भात गौरी भिडे यांनी सबळ पुरावा दाखल करू शकल्या नाहीत. परिणामी न्यायालयाने ही याचिका फेटाळली आहे. “ याचिकाकर्त्यांनी केलेले आरोप सिद्ध करण्यात ते अपयशी ठरले आहेत. ठाकरें कुटुंबीयांविरोधातील आरोप सिद्ध करण्यात याचिका कर्ते कमी पडले, असे मत न्यायालयाने नोंदवले.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरे पर्यावरणमंत्री असताना 2020 ते 2022 या कोरोना काळात सामना वृत्तपत्राचा टर्नओव्हर 42 कोटी रुपये इतका होता, ज्यात झालेल्या साडे अकरा कोटी रुपयांच्या नफ्यावरदेखील प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्यांना मिळणारी मिळकत आणि त्यांचे राहणीमान यात फार मोठा फरक आहे. नुकतेच ठाकरे कुटुंबीयांनी मातोश्री या त्यांच्या निवासस्थानासमोर आकरा मजली इमारत बांधली आहे. त्यांच्याकडे असणाऱ्या अलिशान गाड्या. या सर्व गोष्टींचा आर्थिक ताळेबंद लागत नाही. मिळकतीपेक्षा जास्त उत्पन्न कसं काय ? असा सवाल त्यांनी याचिकेत विचारला होता. शिवाय उद्धव ठाकरे कुटुंबाच्या उत्पन्नाचा नेमका स्त्रोत काय? असा सवाल विचारताना त्यांच्या उत्पन्नाच्या स्त्रोताची चौकशी व्हावी, अशी मागणी या याचिकेत केली होती.
कोण आहेत गौरी भिडे?
गौरी भिडे व्यवसायाने प्रकाशक आहेत. 'राजमुद्रा' नावाची त्यांची प्रकाशन संस्था आहे. सामना आणि मार्मिकच्या विक्रीतून एवढी संपत्ती गोळा करणं अशक्य असल्याचा आरोप गौरी भिडे यांनी केला आहे.आपलाही हाच व्यवसाय आहे. या व्यवसायाची आपणास चांगली माहिती आहे. त्यामुळे दोघांच्या उत्पन्नात एवढा फरक कसा? असा सवाल गौरी भिडे यांनी विचारला होता. त्या आधारेच त्यांनी याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात भिडे सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.