उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय : शक्ती मिल बलात्कार प्रकरणातील आरोपींची फाशी रद्द

आरोपींना सुनावण्यात आलेल्या फाशीची शिक्षा रोखली आहे. त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय : शक्ती मिल बलात्कार प्रकरणातील आरोपींची फाशी रद्द
mumbai-highcourtsarkarnama

मुंबई : देशाला हादरुन टाकणाऱ्या शक्ती मिल सामुहिक बलात्कार (Shakti Mill Gang Rape) प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं आपला अंतिम निर्णय सुनावला. मुंबई सत्र न्यायालयानं 4 डिसेंबर 2014 रोजी सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेला आरोपींनी हायकोर्टात दिलेलं आव्हान कोर्टानं 3 जून 2019 मध्ये फेटाळून लावलं होतं. यातील तीन आरोपीची फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती.

आज सुनावनीसाठी आरोपींना व्हिडिओ कॅान्फरन्सच्या माध्यमातून हजर करण्यात आले. राज्य सरकारचे वकिल दिपक साळवी हे देखील या सुनावनीला आँनलाईन उपस्थित होते. 2013 मध्ये शक्तीमिल सामुहिक बलात्कार प्रकरणात विजय जाधव, कासीम बंगाली, सलिम अंसारी, यांना फाशीची शिक्षा सुनावली होती.

या तिघांनी सत्र न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मुंबई सत्र न्यायालयानं 4 डिसेंबर 2014 रोजी सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेला आरोपींनी हायकोर्टात दिलेलं आव्हान कोर्टानं 3 जून 2019 मध्ये फेटाळून लावलं होतं. आज न्यायालयाने या आरोपींना सुनावण्यात आलेल्या फाशीची शिक्षा रोखली आहे. त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. राज्य सरकारनं या खटल्यासाठी अॅड. दिपक साळवी यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली होती.

mumbai-highcourt
गोठविणाऱ्या थंडीत गार पाण्यानं अंघोळीचं ‘सुख' अनुभवण्यासाठी महाराष्ट्र सदनात या !

शक्ती मिल बलात्कार प्रकरणी सुनावलेली फाशीची शिक्षा ही कायद्याच्या चौकटीत बसणारी आहे, असा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयानं दिला होता. राज्य सरकारनं ही फाशी निश्चित करण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. बलात्कार हा हत्येपेक्षा भयंकर गुन्हा आहे, कारण इथं केवळ पीडीतेच्या शरीरावरच नाही तर आत्म्यावर घाला होतो. बलात्काराच्या मानसिक धक्यातून पीडीतेला सावरण्यास बराच मोठा कालावधी जातो. के.ई.एम. च्या नर्स अरूणा शानबाग यातर अखेरच्या श्वासापर्यंत यातून सावरूच शकल्या नाहीत. त्यामुळे बलात्कारांची वाढती संख्या आणि समाजात वाढत जाणारा रोष पाहता कायद्यातील नव्या सुधारणेनुसार शक्ती मिल बलात्कार प्रकरणी दिलेली फाशीची शिक्षा योग्यच असल्याचा दावा राज्य सरकार आणि केंद्र सरकारनं हायकोर्टात केला होता.

मुंबईतील महालक्ष्मी येथील शक्ती मिल कंपाऊंडमध्ये 22 ऑगस्ट 2013 रोजी संध्याकाळच्या वेळी एक महिला छायाचित्रकार आपल्या सहकाऱ्यासोबत फोटाग्राफी करण्यासाठी गेली होती. त्यावेळी तिच्यावर पाच नराधमांनी बलात्कार केला होता. या प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने आरोपी विजय जाधव, कासीम बंगाली, सलिम अन्सारी, सिराज खान आणि एका अल्पवयीन मुलाला अटक केली होती.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in