अनिल देशमुख आणि अडसूळ दोघांनीही लढविले हे डावपेच..... पण?

ईडीने (ED) सुरू केलेली कठोर कारवाई थांबविण्याची दोन्ही नेत्यांची मागणी
अनिल देशमुख आणि अडसूळ दोघांनीही लढविले हे डावपेच..... पण?
anil deshmukhsarkarnama

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ (Anandrao Assul) यांच्याविरुद्ध अंमलबजावणी संचालनालयाने (ED) कारवाई सुरू केली आहे. मात्र दोघांनाही अद्याप पकडू शकलेली नाही. हे दोघेही ईडीच्या कारवाईच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात गेले आहेत. यात अडसूळांना दिलासा देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. तर देशमुखांच्या याचिकेवर आता 12 आॅक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे.

anil deshmukh
'माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी सिटी बॅंक लूटून खाल्ली'; पाहा व्हिडिओ

आनंदराव अडसुळ यांचे वय व आजारपण लक्षात घेता न्यायालयाकडून दिलासा मिळावा, अशी मागणी त्यांनी वकिलामार्फत केली होती. तसेच ईडीने दाखल केलेला गुन्हा आणि सुरू असलेली कारवाई चुकीच्या पद्धतीने केली जात असल्याचा दावा करण्यात आला. त्यामुळे हा गुन्हा रद्द करावा, अशी मागणी करण्यात आली होती. हे प्रकरण आज 79 क्रमांकावर सुनावणीसाठी ठेवण्यात आले होते. आनंदराव अडसूळ यांच्या वतीने ऍड ए. चंद्रचूड यांनी युक्तिवाद केला तसेच तसेच अंमलबजावणी संचालनालय यांच्यावतीने असिस्टंट सॉलिसिटर जनरल श्री अनिल सिंग यांनी युक्तिवाद केला. मात्र तातडीने सुनावणी घेण्यास नकार देत पुढील सुनावणी दोन आठवड्यांनंतर 26 आॅक्टोबर रोजी घेण्याचा आदेश देण्यात आला.

anil deshmukh
ED समोर न येणाऱ्या अनिल देशमुखांविरोधात आता न्यायालयानंही काढलं समन्स

दुसरीकडे ईडीतर्फे जारी केलेले समन्स रद्द करावे यासाठी अनिल देशमुख यांनी याचिका केली आहे. या कठोर कारवाईपासून दिलासा देण्याची मागणी यात करण्यात आली आहे. अनिल देशमुख यांच्यावतीने वरिष्ठ वकील विक्रम चौधरी आणि इंद्रपाल सिंह यांनी युक्तिवाद केला. मात्र या वकिलांनी आज फक्त पुढील तारीख मागितली आणि त्याच दिवशी ईडीला सुद्धा त्यांची बाजू मांडण्याची परवानगी देण्यात आली. या प्रकरणात पुढील सुनावणी 12 ऑक्टोबर रोजी होणार आहे.

Related Stories

No stories found.