नितेश राणेेंचा जामीन अर्ज उच्च न्यायालयानं फेटाळला पण अटक नाहीच!

भाजपचे (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) अडचणीत आले आहेत.
Nitesh Rane and Narayan Rane
Nitesh Rane and Narayan RaneSarkarnama

मुंबई : शिवसेना (Shiv Sena) कार्यकर्त्यावर हल्ला केल्याप्रकरणी भाजपचे (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) अडचणीत आले आहेत. उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) नितेश राणेंना दणका दिला आहे. न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. असे असले तरी त्यांना पोलीस तातडीने अटक करू शकत नाहीत. त्यांना न्यायालयाने 27 जानेवारीपर्यंत अटकेपासून संरक्षण दिले आहे.

नितेश राणे यांचा अटकपूर्व जामिनावर निकालासाठी उच्च न्यायालयाने आजचा दिवस निश्चित केला होता. तोपर्यंत राणेंवर अटकेसारखी कठोर कारवाई करणार नाही, अशी हमी राज्य सरकारकडून न्यायालयात देण्यात आली होती. आज उच्च न्यायालयाने राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. याचवेळी न्यायालयाने राणेंना दिलासा दिला आहे. त्यांना अटकेपासून दिलेले संरक्षण 27 जानेवारीपर्यंत वाढवले आहे. त्यांना सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी ही मुभा देण्यात आली आहे. (Nitesh Rane Case Updates)

Nitesh Rane and Narayan Rane
जिल्हा बँकेच्या गायब अध्यक्षांना अखेर उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा

सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेच्या (Sindhudurg DCC Bank) निवडणूक प्रचारामध्ये संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. या प्रकरणात नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सत्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्ण जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यानंतर राणे यांनी उच्च न्यायालयात अर्ज केला होता. त्यावरील दोन्ही बाजूचे युक्तीवाद 13 जानेवारीला पूर्ण झाला होता. राणेंचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला असला तरी त्यांना अटकेपासून संरक्षण कायम ठेवले आहे. त्यामुळे पोलीस त्यांना 27 जानेवारीपर्यंत अटक करू शकत नाहीत.

Nitesh Rane and Narayan Rane
बायको अन् दीड वर्षाच्या मुलीसोबत आत्महत्या करणार होतो! विशाल फटेनंच दिली कबुली

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणूक प्रचारादरम्यान शिवसेनेचे प्रचारक संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला केला, अशी फौजदारी फिर्याद कणकवली पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. सत्र न्यायालयाने नितेश राणेंचा जामीन अर्ज यापूर्वी फेटाळला होता. त्यामुळे आता त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आता उच्च न्यायालयानेही त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. दरम्यान, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राणे गटाला बहुमत मिळाले तर महाविकास आघाडीला पराभवाचा सामना करावा लागला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com