गुणरत्न सदावर्तेंना उच्च न्यायालयाकडून दिलासा

Gunratna Sadavarte| High Court|Pune| एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सदावर्तेंनी मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते.
Gunratna Sadavarte
Gunratna Sadavarte

मुंबई : उच्च न्यायालयाने अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना मोठा दिलासा दिला आहे. पुण्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यामध्ये गुणरत्न सदावर्ते (Ad Gunratna Sadavarte) यांना अटकपुर्व जामीन मंजूर केला आहे. पंचवीस हजार रुपयांच्या जातमुलचलक्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. आक्षेपार्ह वक्तव्य करणं, दोन समाजात तेढ निर्माण करणं, या अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पुण्याच्या विद्यापीठ पोलिसांनी कालच सदावर्तेंचा ताबा घेण्यासाठी आर्थर रोड जेल प्रशासनाकडे अर्ज केला होता. त्याविरोधात सदावर्तेंनी मुंबई उच्च न्यायालयात अटकपुर्व जामीन अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेत सदावर्तेंना अटकपूर्व जामीन मंजूर केला.आता सदावर्तेंना पुण्याच्या प्रकरणातून अटक होणार नसली तरी इतर प्रकरणात ते कोठडीत असतील. त्या प्रकरणांमध्ये त्यांना जामीन मिळत नाही तोपर्यंत त्यांना जेलमध्येच राहावं लागणार आहे.

Gunratna Sadavarte
सदावर्तेंचे १५ दिवसांपासून तुरुंगात उपोषण; फक्त ज्यूस पित असल्याची माहिती

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सदावर्तेंनी मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यावरून पुण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचबरोबर, दोन आठवड्यांपूर्वी खासदार शरद पवार यांच्या मुंबईतील घरासमोर हिंसक आंदोलन प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर राज्यभर वेगवेगळ्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले.

सुरुवातीला मुंबई पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. त्यानंतर त्यांची रवानगी सातारा कारागृहात करण्यात झाली. साताऱ्यानंतर सदावर्तेंना कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर त्यांना पुन्हा मुंबई आर्थर रोड जेलमध्ये सदावर्ते यांना आणण्यात आलं. सदावर्तेंनीच मराठा समाजाविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केले होते हे तपासण्यासाठी त्यांच्या आवाजाचे नमुने घेण्याची गरज असल्याचे राज्य सरकारचे उच्च न्यायालयाला सांगितले होते. मात्र, सातारा पोलिसांनी याच संदर्भात दाखल अन्य गुन्ह्यात सदावर्तेंच्या आवाजाचे नमुने घेतल्याचे सांगत आता पुन्हा आवाजाच्या नमुन्यांची गरज काय? असा सवाल न्यायालयाने केला.

अशातच मागील १५ दिवसांपासून गुणरत्न सदावर्ते यांचे तुरुंगातच उपोषण सुरु असल्याची माहिती मिळत आहे. सरकारी वकील अरूणा पै यांनी याबाबतची माहिती दिली आहे. मागच्या १५ दिवसांपासून सदावर्ते जेवत नसून ते त्यांनी जेवण करण्याचे ठरवले आहे. ते ज्या-ज्या पोलिस ठाण्याच्या कोठडीत होते, तिकडचे पोलिस वेळोवेळी त्यांना अन्न ग्रहण करण्याची विनंती करत होते. मात्र ते सकाळ-संध्याकाळ केवळ ज्युस पीत असल्याची माहिती दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com