Antilia Bomb Case : अँटिलिया स्फोटक प्रकरणात मोठी अपडेट ; महत्वाच्या आरोपीला जामीन मंजूर

25 फेब्रुवारी 2021 रोजी मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर पडलेल्या वाहनात स्फोटके सापडली होती.
Antilia Case
Antilia Case Sarkarnama

Antilia Bomb Case : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया स्फोटकेप्रकरणी (Antilia Case) अटकेत असलेले माजी पोलीस अधिकारी रियाज काजी यांना मुंबई उच्च न्यायालयाने अखेर सशर्त जामीन मंजूर केला आहे. उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते –डेरे यांच्या खंडपीठाने आज (२३ डिसेंबर) काझी यांना २५ हजार रुपयांच्या जामिनावर सुटका केली. तसेच त्यांचा पासपोर्ट कनिष्ठ न्यायालयात जमा करण्याचे आणि तपास यंत्रणेला सहकार्य करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ एका वाहनात स्फोटके सापडल्याप्रकरणी काझी यांना अटक करण्यात आली होती. काजी हे बडतर्फ सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझेचे निकटवर्ती आहेत. त्यांना राष्ट्रीय तपास संस्थेने अटक केली होती. काझी यांनी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाजे यांच्या संगनमताने पुरावे नष्ट केल्याचा आरोप आहे. अंबानींच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर जिलेटिनच्या कांड्या भरलेली स्कॉर्पिओ कार सापडली तेव्हा सचिन वाजे यांच्यासोबत काम करणारा काझी मुंबई क्राइम ब्रँचच्या क्राइम इंटेलिजन्स युनिटमध्ये तैनात होता. काझी यांच्यावर गुन्हेगारी कट रचणे आणि गुन्ह्याचा पुरावा नष्ट करणे, असे आरोप लावण्यात आले आहेत.

Antilia Case
एनआयएने अटक केलेला API रियाझ काझी पोलिस दलातून निलंबित

रियाज काझी याची अनेक दिवसांपासून एनआयए कार्यालयात तासनतास चौकशी सुरु होती. रियाजसह अनेक अधिकाऱ्यांचीही एनआयए चौकशी करत आहे. रियाज काझी हा ज्या सीआययू विभागात काम करत होता, त्याचे नेतृत्व सचिन वाझे Sachin Waze करत होता. एनआयएने या संपूर्ण कार्यालयाची झडतीही घेतली होती. सचिन वाझेला अटक झाल्यानंतर एनआयएचे अधिकारी रियाज काझीला बोलावून वारंवार त्याच्याकडे चौकशी करत होते.

काय आहे संपूर्ण प्रकरण

25 फेब्रुवारी 2021 रोजी मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर पडलेल्या वाहनात स्फोटके सापडली होती. ही कार व्यापारी हिरेन मनसुख यांची असल्याचा दावा करण्यात आला होता. पण ५ मार्च रोजी मुंबईजवळील ठाणे जिल्ह्यातील नाल्यात मनसुख हिरेन यांचा मृतदेह आढळला होता.या प्रकरणाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली होती. पुढे या प्रकरणात मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांवर बेकायदा वसुली केल्याचा आरोप झाला. मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या बेकायदेशीर वसुलीचा आरोप केले. या प्रकरणी देशमुख आणि वाजे अजूनही तुरुंगात आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com