शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला न्यायालयाचा मोठा दिलासा

अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) हिचा पती राज कुंद्रा (Raj Kundra) याला मुंबई पोलिसांनी अटक केली होती.
Raj Kundra and Shilpa Shetty
Raj Kundra and Shilpa ShettyFIle Photo

मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) हिचा पती राज कुंद्रा (Raj Kundra) याला मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अटक केली होती. पॉर्न फिल्मची निर्मिती आणि वितरण केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली होती. कुंद्रा याला न्यायालयाने जामीन मंजूर करण्यात आल्यानंतर अखेर त्याची दोन महिन्यांनंतर काराग़हातून सुटका झाली होती. आता आणखी एका प्रकरणात उच्च न्यायालयाने कुंद्राला मोठा दिलासा दिला आहे.

कुंद्रा (वय 45) याला पॉर्न फिल्म रॅकेटप्रकरणी 19 जुलैला अटक झाली आहे. या प्रकरणात एकूण 12 आरोपी आहेत. अश्लील चित्रपटांची निर्मिती करुन त्यांचे वितरण केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. कुंद्रा याला सुरवातीला पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. नंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार कुंद्रा असल्याचा दावा मुंबई पोलिसांनी केला आहे. पोलिसांनी कुंद्राकडून 48 टीबी डेटा जप्त केला असून, यात अश्लील फोटो, व्हिडीओंचा समावेश आहे.

उच्च न्यायालयाने राज कुंद्राला चार आठवडे अटकेपासून संरक्षण दिले आहे. पॉर्नोग्राफी प्रकरणी 2020 मध्ये दाखल आणखी एका गुन्ह्यात न्यायालयाने त्याला हा दिलासा दिला आहे. अश्लील व्हिडीओ स्ट्रिम करणाऱ्या व्हिडीओ अॅप्लिकेशनच्या त्याच्याकडे मालकी होती. या अॅप्लिकेशनच्या माध्यमातून तो अश्लील व्हिडीओ स्ट्रिम करण्यासोबत वितरीत करीत होता, असा आरोप त्याच्यावर आहे.

Raj Kundra and Shilpa Shetty
मोदी सरकार झुकलं! आणखी एक मोठा निर्णय मागे घेण्याच्या तयारीत

उच्च न्यायालयाने कुंद्रा याचा अटकपूर्व जामीन उच्च न्यायालयाने फेटाळला होता. मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने दाखल केलेल्या प्रकरणात त्याने हा अर्ज केला होता. त्याने या निर्णयाला पुन्हा उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. यावर उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला नोटीस बजावली आहे. कुंद्राच्या याचिकेवर म्हणणे मांडण्याचा आदेश न्यायालयाने सरकारला दिला आहे.

Raj Kundra and Shilpa Shetty
मलिकांच्या विरोधात थेट विनयभंगाची तक्रार; आणखी एका वानखेडेंनी आणलं अडचणीत

या प्रकरणात मुंबई पोलिसांनी १ हजार ४०० पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. यानंतर त्याने जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. या प्रकरणात आरोपपत्र दाखल झाले असून, तपासही पूर्ण झाला आहे, त्यामुळे जामीन मिळावा, अशी विनंती त्याने न्यायालयाकडे केली होती. अखेर न्यायालयाने त्याला जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला होता. त्यामुळे तब्बल दोन महिन्यांनी तो कारागृहातून सुटला होता. कारागृहातून बाहेर आल्यानंतर भावनिक झालेल्या राजला अश्रू आवरता आले नव्हते. तो माध्यमांशी काहीही न बोलता तेथून निघून गेला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com