भाजपच्या नरेंद्र मेहतांना उच्च न्यायालयाचा दिलासा; 30 मे पर्यंत अटक न करण्याचे आदेश!

मेहता (Narendra Mehta) यांच्यावर काही दिवसांपूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भ्रष्टाराच प्रकरणी गुन्हा दाखल केला होता.
भाजपच्या नरेंद्र मेहतांना उच्च न्यायालयाचा दिलासा; 30 मे पर्यंत अटक न करण्याचे आदेश!
Narendra Mehtasarkarnama

भाईंदर : मीरा-भाईंदर भाजपचे (BJP) माजी आमदार नरेंद्र मेहता (Narendra Mehta) यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून अंतरिम दिलासा मिळाला आहे. 30 मे पर्यंत मेहता यांना अटक न करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने तपास यंत्रणांना दिले आहेत.

नियमित अटकपूर्व जामिनासाठी ठाणे सत्र न्यायालयात दाद मागण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने मेहता यांना दिले आहे. मेहता यांच्यावर काही दिवसांपूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भ्रष्टाराच प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. मेहतांच्या अनेक ठिकाणावर टाकण्यात आलेल्या धाडीमध्ये महत्वाचे कागदपत्रे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहेत. मात्र, दिलासा मिळावा म्हणून मेहता यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. आता या प्रकरणात 30 मे रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

Narendra Mehta
१३ तासांच्या चौकशीनंतर परब म्हणाले, सगळ्याचा खुलासा न्यायालयात होईल

दरम्यान, मेहता यांच्याविरोधात गैरमार्गाने संपत्ती जमा केल्याबद्दल ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) सर्व ज्ञात स्रोतातून मिळवलेल्या उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती जमवल्याचा ठपका ठेवत गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात मेहता यांच्या पत्नी सुमन मेहता यांच्या विरोधातही गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी प्रतिबंधक विभागाच्या दोन पथकांकडून मेहतांच्या घर व कार्यालयात तपासणी सुरू करण्यात आली होती.

Narendra Mehta
मोठी बातमी : बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना CBI कडून अटक

मिरा-भाईंदरचे आमदार मेहता यांनी लोकसेवक पदाचा दुरुपयोग करून उत्पन्नापेक्षा अधिकची संपत्ती जमविल्याप्रकरणी २०१६ मध्ये लोकायुक्तांकडे तक्रार करण्यात आली होती. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत खुल्या चौकशीचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार गुरुवारी (ता. १९) ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी सुरू होती. एसीबी पथकाची ही चौकशी पूर्ण झाली असून याप्रकरणी त्यांनी नरेंद्र मेहतांवर नवघर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला होता. त्या प्रकरणात न्यायालयाने त्यांना दिलासा दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in