उच्च न्यायालयाचा मलिकांना दिलासा अन् वानखेडेंना दणका

अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांना उच्च न्यायालयाने दणका दिला आहे.
उच्च न्यायालयाचा मलिकांना दिलासा अन् वानखेडेंना दणका
Nawab Malik and Sameer WankhedeSarkarnama

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना आज उच्च न्यायालयाने (High Court) दिलासा दिला आहे. याचवेळी अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाचे (NCB) विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांना दणका दिला आहे. वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबीयांबद्दल जाहीरपणे बोलण्यास मलिक यांच्यावर निर्बंध घालण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. तसेच, प्रथमदर्शनी मलिक यांनी केलेले आरोप खोटे असल्याचे दिसत नाही, असेही निरीक्षण नोंदवले आहे.

उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, मलिक यांच्यावर पूर्णपणे निर्बंध घालता येणार नाहीत. परंतु, वानखेडे यांच्याबद्दल जाहीरपणे विधाने करताना मलिक यांनी योग्य काळजी घ्यावी. खासगीपणाचा हक्क आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य यांचा समतोल राखायला हवा. अधिकारी व्यक्तीवर बोलण्याचा जनतेला अधिकार आहे. मलिक यांनी वानखेडे यांच्यावर केलेले आरोप पूर्णपणे खोटे आहेत, असे प्रथमदर्शनी तरी दिसत नाही.

समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी मलिक यांच्याविरोधात सव्वा कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. यावरील सुनावणी पूर्ण झाली होती आणि न्यायाधीश माधव जामदार यांनी निकाल राखून ठेवला होता. मलिक यांना आपण व आपल्या कुटुंबीयांबद्दल बोलण्यास निर्बंध घालावेत, अशी मागणी ज्ञानदेव वानखेडे यांनी केली होती.

Nawab Malik and Sameer Wankhede
मोठा गाजावाजा करीत मंत्रिमंडळ विस्तार झाला पण महत्वाची खाती मुख्यमंत्र्यांकडेच!

मलिक सतत वानखेडे यांच्याबाबत रोज नवीन खुलासे करत आहेत. यामध्ये ज्ञानदेव वानखेडे यांचे नाव दाऊद आहे आणि समीर यांनी मुस्लिम असूनही राखीव गटातून केंद्र सरकारची नोकरी मिळवली, असा आरोप केला आहे; मात्र हा आरोप आधारहिन आहे. मलिक निराधार आरोप करून आमची प्रतिमा मलीन करीत आहेत, असा आरोप वानखेडे यांनी केला आहे. मलिक यांच्याविरोधात सव्वा कोटी रुपयांचा मानहानीचा दावा त्यांनी केला असून यापुढे त्यांना कुटुंबाबद्दल काहीही विधान करण्यासाठी मनाई करण्याची मागणी केली होती.

Nawab Malik and Sameer Wankhede
सर्वांना बूस्टर डोस अन् लहान मुलांनाही कोरोना लस; सरकारचा मोठा निर्णय

मलिक यांनी उच्च न्यायालयामध्ये अनेक कागदपत्रे सादर केली होती. या कागदपत्रांमध्ये मुंबई महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांचे प्रतिज्ञापत्र होते. यामध्ये समीर वानखेडे यांनी नाव बदलल्याचा दावा करण्यात आला होता. तसेच, त्यांचा शाळा सोडल्याचा दाखलाही होता. हा दाखला सेंट जोसेफ विद्यालय आणि सेंट पॉल विद्यालयाचा आहे. तसेच, सेंट पॉल विद्यालयात प्रवेश घेतानाचा अर्ज होता. याचे खंडन करण्यासाठी वानखेडे यांनी महापालिकेच्या वतीने दिलेला डिजिटल जन्मदाखला आणि जात प्रमाणपत्र सादर केले होते.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in