Jitendra Awhad
Jitendra AwhadSarkarnama

आव्हाडांना मोठा दिलासा! सीबीआयकडे तपास देण्यास उच्च न्यायालयाचा नकार

सिव्हील इंजिनिअर अनंत करमुसे यांना मारहाण केल्याचे प्रकरण

ठाणे : गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या विरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी ठाण्यातील सिव्हील इंजिनिअर अनंत करमुसे यांना एप्रिल 2020 मध्ये मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणी आव्हाड यांना अटक झाली होती आणि त्यांना तातडीने जामीनही मिळाला होता. या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (CBI) सोपवावा, अशी मागणी उच्च न्यायालयाने (High Court) फेटाळून लावली आहे.

आव्हाड हे सरकारमध्ये मंत्री असल्यामुळे योग्य पद्धतीने तपास होणार नाही, असा दावा करीत हा तपास सीबीआयकडे द्यावा, अशी मागणी उच्च न्यायालयात करण्यात आली होती. उच्च न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे आव्हाडांना दिलासा मिळाला आहे. या प्रकरणाचा तपास आता मुंबई पोलिसांकडेच राहणार आहे. आव्हाड यांनी मारहाण केल्याचा आरोप करमुसे यांनी केल्याने मोठा गदारोळ उडाला होता.

ऐन लॉकडाऊन काळात 5 एप्रिल 2020 रोजी ठाण्यात मध्यरात्री सिव्हील इंजिनिअर अनंत करमुसे यांना घरातून उचलून नेऊन त्यांना बेदम मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या सुरक्षा व्यवस्थेतील तीन पोलीस शिपायांचा सहभाग असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये समोर आले होते. कोरोना काळातही हे प्रकरण राजकीयदृष्ट्या चांगलेच गाजले आणि राज्यभर त्याची चर्चाही झाली होती. आव्हाड यांच्यासारख्या मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावे, अशी मागणी त्यावेळी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली होती.

 Jitendra Awhad
राज ठाकरेंच्या सभेला परवानगी कोण देणार? गृहमंत्री वळसे पाटलांनी नावच सांगितलं

आपल्याला 15-20 जणांनी घरातून उचलून आव्हाड यांच्या बंगल्यावर नेऊन मारहाण केली, अशी तक्रार करमुसे यांनी पोलिसांकडे केली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर काही जणांना अटक करण्यात आली होती. मात्र, यातील मुख्य सूत्रधाराला अटक व्हावी अशी मागणी करत करमुसे यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यांनी आव्हाड यांनाही आरोपी करण्याची मागणी केली होती. आव्हाड यांच्या बंगल्यातील त्या दिवसाचे सीसीटीव्हीचे फुटेज तातडीने ठाणे दंडाधिकारी न्यायालयात दाखल करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने पोलिसांना दिला होता. यानंतर आव्हाड यांना अटक झाली होती.

 Jitendra Awhad
नवनीत राणांना प्यायला पाणीही नाही? गृहमंत्री वळसे पाटलांनी थेट चौकशी करूनच दिलं उत्तर

नेमकं प्रकरण काय?

करमुसे याने 2017-18 मध्ये फेसबुकवरुन शरद पवार यांना शरदुद्दीन आणि जितेंद्र आव्हाडांना जितुद्दीन या नावाने उल्लेख करत ट्रोल केले. तो 2018 पर्यंत सातत्याने ट्रोल करत होता. नंतर 2018 मध्ये जितेंद्र आव्हाडांनी त्याला ट्विटरवरुन ब्लॉक केले होते. त्यानंतर तो फेसबुकवरुन जितेंद्र आव्हाडांना ट्रोल करत होता. एकेदिवशी त्याने जितेंद्र आव्हाडांचा नग्न फोटो फेसबुकवर टाकला होता. त्यामुळे कार्यकर्त्यांचा राग अनावर होऊन करमुसेला मारहाण झाली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com