'सात्विक संतापाने आव्हाडांवर खोटा गुन्हा कसा हे सांगणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी करुणा मुंडेंना आठवावे...'

Jitendra Awhad News : जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संतापले होते
Jitendra Awhad, karuna munde
Jitendra Awhad, karuna mundeSarkarnama

Jitendra Awhad News : राष्ट्रावादी काँग्रेसचे (NCP) नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यावर सोमवारी विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला. आव्हाड यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका केली. यावरुन सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना राज्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या मतदार संघात घडलेल्या घटनेची आठवण करुन दिली आहे.

या संदर्भात कुलकर्णी यांनी फेसबुकवर पोस्ट केली आहे. कुलकर्णी यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की ''जितेंद्र आव्हाड यांच्यावर दाखल झालेला गुन्हा हा महाराष्ट्रातील राजकारणाचा राजकीय स्तर अधिक तळाकडे ढकलणारा आहे, त्याचा निषेधच आहे. मात्र, आज राष्ट्रवादीचे सारे नेते ज्या सात्विक संतापाने खोटा गुन्हा कसा या विषयावर अस्वस्थ होऊन बोलत आहेत ते बघताना मला करुणा मुंडे आठवल्या...

Jitendra Awhad, karuna munde
Marathwada : `भारत जोडो`च्या उत्कृष्ट नियोजनानंतर चव्हाणांवर आणखी एक मोठी जबाबदारी..

राष्ट्रवादीचेच धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या गावात त्या पत्नीच्या नात्याने गेल्या तेव्हा त्यांच्या गाडीत पिस्तुल टाकली गेली. समोरच्या अनोळखी महिला कोण आहेत हे माहीत नसताना त्यांच्यावर त्या महिलांनी थेट अट्रोसिटी टाकली. त्या १४ दिवस तुरुंगात होत्या. स्वतःच्या पत्नीवर इतक्या खालच्या पातळीवर खोटे गुन्हे टाकणाऱ्या व त्यांना तुरुंगात टाकणाऱ्या धनंजय मुंडे यांच्या या वर्तनाविषयी राष्ट्रवादी चा एकही नेता तेव्हा बोलला नाही किंवा केसेस मागे घेण्याविषयी सांगितले नाही, आणि हेच आज सारे नेते खोटे गुन्हे या विषयावरून नैतिक मुद्दे मांडत आहेत. फक्त त्या प्रसंगांची आठवण' असा टोला त्यांनी लगावला आहे.

Jitendra Awhad, karuna munde
मोठी बातमी : जितेंद्र आव्हाडांना जामीन मंजूर

आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली होती. तर कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरुण आंदोलन केले होते. राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यादेखील आक्रमक झाल्या होत्या. जयंत पाटील यांनी तर पत्रकार परिषदेमध्ये थेट विनयभंगाच्या कलमाची व्याख्याच वाचून दाखवली होती. यावरुन कुलकर्णी यांनी राष्ट्रवादीचे कान टोचले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com